रहदारीस अडथळा निर्माण करणा-यांवर कारवाई

हेल्मेट परिधान करण्याचे खामगांव पोलीसांचे जनतेला आवाहन.

खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 129/177 नुसार लोकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही वर्णनाच्या मोटार सायकलवर वाहतुक करणारे चार वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने मोटार सायकल चालवताना व त्यावर प्रवास करताना केंद्र शासनाने दिलेल्या मानकानुसार हेल्मेट परिधान केल्याशिवाय कोणीही मोटार सायकल चालवणार नाही. याचे उल्लंघन केल्यास 1,500/- रुपये दंड आकारण्यात येणार असुन दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन खामगांव पोलीसांनी केले आहे.



त्याच प्रमाणे शहरामध्ये रहदारीस अडथळा निर्माण करुन येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना अडचण होईल अशा ठिकाणी आमरोडवर तसेच पायवाटेवर आपले वाहन, दुकान तसेच पोस्टर, बॅनस, हातगाडे लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मोहीम पो.स्टे. खामगांव शहर येथील वाहतुक शाखा व RCP पथक असे धडाक्याने राबवित असुन शहरातील रोडवर तसेच पायवाटेवर आपले वाहन, दुकान तसेच पोस्टर, बॅनस, हातगाडे लावुन रहदारीस अडथळा करु नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

तसेच ट्रीपलशीट, विनालायसन, विनाकागदपत्र, विनाहेल्मेट(दुचाकी), फॅन्सी नंबर प्लेट तसेच वाहनांमध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन अनावश्यक बदल करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.


Post a Comment

أحدث أقدم