अभाविप च्या वतीने अनोख्या पद्धतीने होळी साजरी
"अनिती, कुप्रथा चा नायनाट करण्यासाठीच होळी चे दहन करण्यात येते-महादेवराव भोजने"
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक माधवनगर स्थित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला.यावेळेस कार्यकर्त्यांनी अनिती, भ्रष्टाचार, आतंकवाद, लव जिहाद , शैक्षणिक जिहाद,शिक्षणाचे बाजारीकरण, व्यसनाधीनता,दहशतवाद, बलात्कार, घुसखोरी, जातीयवाद, दृष्टाचार आदींचे पत्रके तयार करून सर्व दुर्गुण होलीका मध्ये नष्ट करून नवीन ऊर्जा, भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण व्हावा अशी प्रार्थना उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.याप्रसंगी उत्सवाचे प्रमुख वक्ते खामगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी जिल्हा संघचालक महादेवराव भोजने यांनी जगात भारत हा एकमेव संस्कृती प्रधान देश आहे. सध्या च्या काळात फोफावत असलेली कुप्रथा आजच्या दिवशी नष्ट करून उद्याचा नवभारत निर्माण व्हावा. भारत मातेला परमवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प कार्यर्त्यांनी यानिमित्त करावा अशी अपेक्षा महादेवराव भोजने यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण कथेतुन होलिका दहनाचे महत्व त्यांनी विशद केले.
यावेळी समाजसेवक संजय भोजने व ज्योती भोजने यांच्या हस्ते होळी ची रितसर पुजा करण्यात आली.यावेळी अभाविप शाखा उपाध्यक्ष अस्मिता भोजने, जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, नगर मंत्री गणेश कठाळे,वैष्णवी जवळकार,सानिका राठोड,साक्षी भोजने,सुयोग चंद्रे,ओम काळे,अतुल चव्हाण,शुभम राजपूत,वेदांत भोजने,शुभम राठोड,उदय गायकवाड तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक व अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित होते .



إرسال تعليق