22 मार्च रोजी अंबाजोगाई येथे लोकन्यायालय

आपसांत तडजोड करून आपले दाखलपुर्व व प्रलंबीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा 

अंबाजोगाई जनोपचार न्यूज नेटवर्क : दिनांक २२ मार्च, २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दाखलपुर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवाणी दावे, बँकाची कर्ज प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भुसंपादन प्रकरणे, कौटूंबिक कलह प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोड झाल्यास शंभर टक्के न्यायालयीन शुल्क परत मिळते. तरी राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये आपसांत तडजोड करून आपले दाखलपुर्व व प्रलंबीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मा. दिपक द. खोचे, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१, अंबाजोगाई, मा. संजश्री जे. घरत, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२, अंबाजोगाई, मा. माणिक ये. वाघ, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अंबाजोगाई व अॅड. अजित रा. लोमटे, अध्यक्ष, वकील संघ, अंबाजोगाई, अॅड. दिलीप र. गोरे, उपाध्यक्ष, वकील संघ, अंबाजोगाई, अॅड. रविकांत शि. सापते, सचिव, वकील संघ, अंबाजोगाई, अॅड. बळीराम अ. पुरी, सहसचिव, वकील संघ, अंबाजोगाई व अॅड. सय्यद शोअब अफसर, ग्रंथपाल, वकील संघ, अंबाजोगाई यांनी जनतेस केलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم