अश्लील भाषेत बोलून फिर्यादिस लग्न होऊ न देण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 

अंबाजोगाई:- येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. मेहता साहेब यांचे न्यायालयात आर.आर.सी. नं. २९२/२०१९ सरकार वि. गोविंद या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी गोविंद विश्वनाथ गिरी रा. तत्तापुर ता.रेणापूर जि. लातूर याची कलम ३५४ (ए), ३५४ (१) (डी), ३८४, ५०६ भादवी सह कलम ६७ आय टी अॅक्ट मधून मा. एस.डी. मेहता साहेब यांनी दि.13/03/2025. रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.



सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, अंबाजोगाई शहरातील मौजे शेपवाडी ता अंबाजोगाई येथे  आरोपी गोविंद गिरी याने त्याचे मोबाईल नंबर  वरुन फिर्यादीचे असलेले  मोबाईल वर फोन करुन फिर्यादीच्या नकळत आरोपीने काढलेले फोटो यातील फिर्यादीस पाठवल्याने फिर्यादीच्या मनास धक्का बसला व सदचे फोटो फिर्यादीच्या घरच्याना व ईतराना दाखविण्याची भिती दाखवून यातील आरोपीने फिर्यादीकडुन वेळोवेळी १,९०,०००/-रु घेतलेले आहेत. ते परत मागीतले असता त्याने माझे पैसे परत दिले नाहीत. नंतर यातील आरोपीने फिर्यादीच्या फोटोचा गैरवापर करुन मोबाईलवर तू आवडतेस मल तुझ्याशी लग्न करायचे आहे मी तुझे लग्न होवु देणार नाही असी धमकी दिली व वारंवार अश्लिील भाषेत बोलुन फिर्यादीचा विनयभंग केला म्हणुन यातील आरोपी विरुध्द भादवी कलम ३५४ (ए), ३५४ (१) (डी), ३८४,५०६ भादवी सह कलम ६७ आय टी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरील प्रकरणाची सुनावणी मा. न्यायालयात झाली असता फिर्यादी पक्षातर्फे एकूण सहा  साक्षीदार तपासण्यात आले. परंतु फिर्यादी पक्ष हा गुन्हा सिद्ध करू न शकल्याने आरोपी गोविंद विश्वनाथ गिरी रा. तत्तापुर ता.रेणापूर जि. लातूर याची कलम ३५४ (ए), ३५४ (१) (डी), ३८४, ५०६ भादवी सह कलम ६७ आय टी अॅक्ट मधून मा. एस.डी. मेहता साहेब यांनी दि.13/03/2025. रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

  सदरील प्रकरणात आरोपी तर्फे अँड.नितीन जाधव यांनी काम पाहिले त्यांना , अँड. जी.व्ही. बुरकुले. ऍड बाळासाहेब गायके यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post