निर्लज्ज बापाच्या पापाचा अखेर धडा भरलाच..

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि मग पोलिसांनी लावला असा छडा..

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा  तब्बल वर्षानंतर उलगडा झाला आहे. डीएनए तपासणीचा अहवाल आल्यानंतर हा धक्कादायक प्रकरनाचा उगड झाला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये जलंब पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करूनतिला प्रेग्रेट केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीची प्रसूती झाल्यानंतर डीएनए तपासणी करण्यात आली. या तपासणीत निरागस मुलीवर तिच्या सख्ख्या जन्मदात्या बापानेच आत्याचार केल्याचे उघड झाले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये नांदुरा येथील एका खाजगी दवाखान्यात १७ वर्षीय मुलीला पोटदुखीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोट दुखीचे निदान करण्यासाठी डॉक्टरांनी सोनोग्राषी केली तेव्हा डॉक्टरांना धक्काच बसला. मुलगी २८ आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले होते. घटनास्थल जलंब पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने नांदुरा पोलिसांनी तसे पत्र जलंब पोलिसांना दिले जलंबी पोलिसांनी पीडितेच्या राहत्या चरी व गावांमध्ये जाऊन चौकशी केली शोध घेतला मात्र कुणीही सापडले नाही, त्यामुळे खाजगी डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणांमध्ये आरोपीचा कोणताही सुगावा लागत नवता, शिवाय पीडित मुलीच्या घरून देखील कोणीही तक्रर करण्यासाठी समोर येत नवहते. दरम्यान पीडित मुलीची प्रसूती झाली, त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गेल्या वर्षी माणजेच २०२४ च्या एप्रिल महिन्यातील २२ तारखेला पीडित मुलगी,  मुलगा आणि पीडित मुलीच्या बापाची डीएनए चाचणी घेण्यात आली. अमरावती येथे डीएनए चाचणी तपासणीसाठी पाठवण्यात आली. डीएनाए चाचणीचा अहवाल १९ महिन्यानंतर हा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला. सदर अहवालानुसार अल्पवयीन मुलीवर तिच्या बापानेच अत्याचार केल्याचे उपडकीस आले आहे. जलंब पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post