"खामगांव शहरात स्वातंत्र महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था उपलब्ध करून द्या: ना.आकाशदादा फुंडकर यांच्या कडे अभाविप ची मागणी"
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा खामगांव च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खामगांव शहरात शिक्षणाचा प्रवाह असुन यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे.शहरात विविध कोर्सेस व प्रशिक्षण करिता महिला शिक्षणा करिता येतात परंतु शहरात महिला करिता स्किल डेव्हलपमेंट करणारे कोर्स ची कमतरता आहे करिता आपण महिला रोजगार संदर्भात विशेष लक्ष देऊन महिला सशक्तीकरणा कडे भर द्यावा अशी मागणी अभाविप च्या शिष्ट मंडळाने कामगार मंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्या कडे केली.
अभाविप च्या महिला पदाधिकारी शाखा उपाध्यक्ष अस्मिता भोजने शाखा सहमंत्री वैष्णवी जवळकार यांच्या सही चे निवेदन ना.आकाशदादा फुंडकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख गणेश घोराळे, जिल्हा संगठनमंत्री महेश वाघमारे,जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, जिल्हा सहसंयोजक सानिका राठोड शाखा उपाध्यक्ष अस्मिता भोजने,नगर मंत्री गणेश कठाळे, नगरसहमंत्री वैष्णवी जवळकार,आनंद निकाळजे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुयोग चंद्रे, आयटीआय काॅलेज अध्यक्ष ओम काळे, वस्तीगृह प्रमुख अतुल चव्हाण, जिल्हा एसएफडी प्रमुख शुभम राजपूत, जिग्नेश कमानी,रोहित महाले, उदय गायकवाड,शुभम राक्षे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




إرسال تعليق