अंबाजोगाई वकील संघाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार 

वकिलांसाठी सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू - एडवोकेट लोमटे 


अंबाजोगाई: - अंबाजोगाई वकील संघाच्या वतीने आज नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वकील संघाचे नवनियुक्त अध्यक्ष एडवोकेट अजित लोमटे यांनी सन्माननीय वकील बांधवांना सोई उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी सण २०२५-२६ साला साठी अंबाजोगाई वकील संघाची निवडणूक अत्यंत खेळी मेळीच्या स्वरूपात पार पहली. या निवडणुकी मध्ये विजय झालेले नवनियुक्त अध्यक्ष अॅड. अजित राजेसाहेब लोमटे, उपाध्यक्ष अॅड. दिलीप रखमाजी गोरे सचिव एडवोकेट रविकांत सापति, सहसचिव एडवोकेट बळीराम पुरी, ग्रंथपाल अॅड. सय्यद शोयब अफसर यांचा आज वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट बी ए पुरी व लिपिक सिद्धेश्वर स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट डी आर गोरे यांनी मानले.



Post a Comment

أحدث أقدم