सरपंच निलेश देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला

सुटाळा फाट्यावरील घटना : एक आरोपी अटकेत इतर फरार

खामगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलिस विभाग गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात अपयशी होत आहे. त्यामुळे गुन्हेगारावरील पोलिसांचा वचक संपल्याचे दिसून येत आहे. 

सद्यस्थितीत बीड येथील सरपंच हत्या प्रकरणाचा संताप महाराष्ट्रभर व्यक्त होत असतांना आता खामगाव येथील सुटाळा भागातील सरपंच निलेश देशमूख यांच्यावर क्षूल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याची घटना आ समोर आली आहे. खामगाव मध्ये सुटाळा  सरपंचावर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. हल्ल्यात निलेश देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना सुटाळा

फाट्यावर घडली. सरपंच देशमूख यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असून ते थोडक्यात बचावले आहे.  दरम्यान ज्या घटनेची माहिती पोलिसानं मिळताच पोलिसांनी हल्ला करणारा एक आरोपी मयूर सिद्धपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

या प्रकरणी पोलिस तपास करीत असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم