जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम 

जागतिक महिला दिनानिमित्त दहा मार्च रोजी दुपारी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे. 



माजी नगरसेविका सौ भाग्यश्री मानकर यांच्या निवासस्थानी डीपी रोड वर्धन लेआउट येथे 10 मार्च रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत महिलांना समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शक कार्यक्रम होणार आहे. यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सरदार मॅडम, समुपदेशक प्रीती मगर ह्या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी असे आवाहन माजी नगरसेविका सौ भाग्यश्री मानकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post