जलालपुरा भागातील शिखस्त इमारतीची गॅलरी कोसळली: एक गंभीर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक जगदंबा रोड जलालपुरा भागातील जुन्या इमारतीचे गॅलरी कोसळून एक गण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश बेकरी त्या बाजूला वानखडे यांची एक इमारत आहे ही इमारत अत्यंत जुनी झाल्याने शिखर झाली आहे. पालिकेने याबाबत संबंधितांना सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली असून अद्याप ही जागा खाली करण्यात आली नाही. दरम्यान रात्री बारा तीस वाजताच्या सुमारास या बिल्डिंगचा गॅलरी कोसळली. यावेळी एका हात गाडीवर झोपलेले सुदाम वानखडे यांच्या अंगावर विटांचा खर्च पडल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

إرسال تعليق