आणि त्या मुलाच्या पालकांनी पोलिसांचे मानले आभार

खामगाव पोलिसांनी लावला त्या मुलाचा तात्काळ शोध

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : दुचाकी घेऊन बेपत्ता झालेल्या 14 वर्षे मुलाचा खामगाव शहर पोलिसांनी तात्काळ शोध घेत त्याला अकोला येथून ताब्यात अवघ्या काही तासातच ते पत्ता झालेला मुलगा मिळून आलेले त्याच्या पालकांनी खामगाव पोलिसांचे आभार मानले.


प्राप्त माहितीनुसार अर्णव गणेश सूर्यवंशी वय 14 वर्ष रा. राजणकर हॉस्पिटल कॉम्प्लेक्स खामगाव हा मुलगा काल रात्री 08.00 वा पासून हॉटेल अण्णा शेगांव रोड येथून त्याचे वडिलांना सोडून ग्रे रंगाची सुजुकी एक्सेस MH 28 BT-0488 घेऊन निघून गेला उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे पालकांनी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी तात्काळ दाखल घेऊन पोलिसांना वेगवेगळ्या दिशेने शोध कार्याचे आदेश दिले. दरम्यान सदर मुलगा हा अकोला येथे आढळून आला. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment

أحدث أقدم