बुलढाणा जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केले आहे. यात कालावधी पूर्ण केलेले अधिकारी तसेच कालावधी पूर्ण ना केलेले अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील एकूण सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले असून इतर जिल्ह्यातून पाच नवीन पोलीस निरीक्षक बुलडाणा जिल्ह्यात रुजू होणार आहे. 

जाहिरात

अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना डॉ. सुखविंदर सिंह यांच्या स्वाक्षरीने आज 27 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातून बदलून जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ब्रह्मदेव सखाराम शेळके यांची जळगाव खान्देशला, माधवराव रावसाहेब गरुड यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागात, सारंगधर वासुदेव नवलकर यांची नंदुरबार, विलास रमेश पाटील यांची वर्धा, विजयकुमार अधिकराव चव्हाण यांची मुंबई शहर, संतोष मनोहरराव महल्ले यांची हिंगोली तसेच नरेंद्र गजाननराव ठाकरे यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. इतर ठिकाणाहून बुलडाणा जिल्ह्यात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सतीश दत्ताराम महल्ले, किशोर गोरख तावडे, आशिष सुरेश इंगळे, पंडित चिंधा सोनवणे तसेच ब्रह्म संताराम गिरी यांचा समावेश आहे.

Post a Comment

أحدث أقدم