शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व शिवसेना पदाधिकारी यांची कार्यकारी अभियंता महावितरण खामगाव यांच्या कडे तक्रारदार
म्हणाले....महावितरण कंपनीचा गलथान कारभार नागरिक त्रस्त कर्मचारी अधिकारी मस्त..
खामगाव शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने शिवसेनेचे नेते राजेंद्र बघे यांनी थेट महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीत म्हटले आहे की शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असतो.विशेष करून सब डिव्हिजन कोलरी अंतर्गत येणाऱ्या पिंप्राळा,पिंप्री गवळी, कोलरी,चितोडा अंबिकापुर निळेगाव यासह पूर्ण डिव्हिजन मध्ये गलथान कारभार चालू आहे वार वार कर्मचारी अधिकाऱ्यास सांगून कोणीही काम करण्यास तयार नाही दोन-चार थेंब पाणी आले किंवा थोडीशी हवाली तरी रात्र रात्रभर लाईन बंद राहते.
याची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नाही सामान्य नागरिक जेव्हा कर्मचारी किंवा अधिकारी यास कॉल करतात कोणीच कॉल घेण्यास तयार नसते.त्यामुळे छोट्या मोठ्या कारणामुळे रात्रभर पूर्ण गाव आंध्रारात राहते याची जबाबदारी कोणी घ्यावी.आपण सर्व कर्मचारी अधिकारी शहरांमध्ये राहतात म्हणून तुम्हास ग्रामीणकडे येण्याकरिता त्रास होतो किंवा वेळ मिळत नाही या आधी सुद्धा तक्रार केली असून रात्रीच्या वेळी फक्त खाजगी व्यक्ती पन्नास शंभर रुपयांमध्ये कामे करतात परंतु ज्यांना चाळीस-पन्नास हजार पगार आहे ते कामे करत नाहीत किंवा रात्री ग्रामीण मध्ये येत नाहीत.
मेंटनस व ट्री कटिंग नावाखाली हजारो लाखो रुपये खर्च करून सुद्धा फॉल्ट कसे होतात व पूर्ण गाव रात्र रात्रभर अंधारात कसे राहतात.मागील पावसाळ्यामध्ये पिंप्री गवळी येथील अरुण पाटील काळे यांच्या शेतातील पोल सह तार पडलेले आहेत. कर्मचारी अधिकारी यांना वेळोवेळी सांगून सुद्धा अद्याप पर्यंत तार पोल शेतामध्ये पडून आहेत.
ग्रामीण भागातील शेतातील वर लोड असलेल्या डीपी संदर्भात केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव साहेब जिल्हा नियोजन मधून मंजुरीचे पत्र देऊन सुद्धा डीपी मंजूर झाल्या नाही तसेच वारंवार निवेदन सुद्धा दिले आहे.त्यामध्ये शहापूर सागर मेतकर,हिंगणा कारेगाव पानझाळे,भालेगाव कुंभेफळ येथील डिप्यांचा समावेश आहे.कधी कधी तर पावसाच्या दोन चार थेंबा मध्ये सुद्धा रात्रभर लाईट जाते कशी असा सामान्य नागरिकांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे त्याच्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का...?तरी आपण आमचे तक्रारीची दखल घेऊन नागरिकांना होणारा त्रास टाढावा अन्यथा पुढील आंदोलन महावितरण ऑफिस मध्ये लाईट बंद व कंदील भेट आंदोलन असेल याची आपण दक्षता घ्यावी.
अशा प्रकारची तक्रार कार्यकारी अभियंता जस्मितिया साहेब यांना देण्यात आली यावेळी शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश भाऊ वावगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,शिवसेना शहरप्रमुख चेतन भाऊ ठोंबरे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भाऊ भिल,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,शिवसेना उप तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,शिवसेनाप्रमुख उप तालुकाप्रमुख शिवशंकर भाऊ सरोदे,शिवसेना उप तालुकाप्रमुख सागर मेतकर,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात,विद्यार्थी यांना उपजिल्हाप्रमुख निलेश देशमुख,शिवसेना अनुसूचित अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर भाई खंडारे,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश भाऊ हिवराळे,किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुडकर,शिवसेना अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख शंकर भाऊ लठाड,अनुसूचित जाती जमाती उपतालुकाप्रमुख अनिल बच्छिरे,सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख प्रदीप बघे,शिवसेना विभाग प्रमुख नामदेवराव टाले,शिवसेना विभाग प्रमुख चेतन शेलकर, शिवसेना विभाग प्रमुख गोपाल शेळके,शाखाप्रमुख गोपाल चव्हाण,ओम देशमुख,प्रभू घोंगे,गणेश लठाड ,राजू इंगळे,दीपक लठाड,राजू पाटील गोळे, उपस्थित होते



إرسال تعليق