अस्तित्व चॅरीटेबल ट्रस्ट ठरत आहे रुग्णासाठी जिवन संजीवनी...
अस्तित्वच्या जीवनदायी भूमिकेमुळे पाच वर्षाच्या अर्जान अलीला मिळाले जिवनदान...!!
हजारो रुग्णांना रुग्णसेवा देऊन त्यांना जीवनदान देणारी अस्तित्व चॅरीटेबल ट्रस्ट ही सेवाभावी संस्था संपुर्ण महाराष्ट्रात सेवेचं व्यासपीठ म्हणुन नावलौकिकास आली आहे.त्यांच नातं माणुसकीचं हे ब्रीदवाक्य सेवेच्या माध्यमातून एक आदर्श सर्वासमोर उभ करत आहे.अस्तित्व परिवाराचे सदस्य सेवेसाठी आणि समाजहितासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेताना नेहमीच पाहायला मिळतात. याचा आणखी एकदा प्रत्यत आला तो म्हणजे,खामगांव तालुक्यातील,गोपाळ नगर,कुंबेफळ येथील रहिवाशी असलेले फिरोज खान यांचा भाचा अर्जान अली जेव्हा जीवघेण्या आजाराशी झुंज देत होता तेव्हा. अर्जान अली हा अवघ्या पाच वर्षाचा आहे.
अर्जानला खामगांव येथील रेनबो हॉस्पिटल मध्ये लाखो रुपयांचा खर्च हाताच्या ऑपरेशन साठी सांगितल्या नंतरही मुलाचा हात वाचेल कीं नाही याची शाश्वती नाहीं. त्यामुळे त्याला मुंबई, नागपूर,अमरावती किंवा संभाजीनगर सारख्या मोठ्या ठिकाणी जाऊनच हे ऑपरेशन करावं लागेल.आपल्याकडे मुलाचा हात वाचवण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत असें मार्गदर्शन रेनबो येथील तज्ञ् डॉक्टरांनी करून पुढील ठिकाणी नेण्याचा सल्ला दिला.त्यामुळे अर्जानचा मामा फिरोज खान हा अर्जानला घेऊन शासकीय रुग्णालय अकोला येथे घेऊन गेला. तेव्हा त्यांना तिथं कुणी ऍडमिट करून घ्यायला सुद्धा तयार नव्हत. अशावेळी जे व्यक्तिमत्व सर्वांना आठवते, तेच व्यक्तिमत्व फिरोज भाऊ आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा आठवलं.ते म्हणजे माणुसकीचा झरा, विश्वासाच पाहिलं नाव, नातं माणुसकीचं जपुन मानवतावादाचे पुरस्कर्ते,अस्तित्व परिवाराचे सर्वेसर्वा, जीवनाची शाश्वती नसणाऱ्या रुग्णांना जिवनदान देणारे अस्तित्व चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आकाश इंगळे...
आकाश भाऊंनी दोन मिनिटात अकोला येथील डॉ.परमित सरांना कॉल करून रुग्णाला सेवा देऊ केली. डॉ.परमित सरांनी सर्व अर्जान अलीचे सर्व रिपोर्ट तपासून पाहल्यांनतर अध्यक्ष आकाश इंगळे यांना फोनद्वारे सत्य परिस्थिती सांगितली.आकाश भाऊंनी आजाराचे गांभीर्य आणि मुलाच्या वेदना लक्षात घेऊन त्यांना सरळ नागपूर गाठायचा सल्ला दिला. नागपूर म्हणताच फिरोज खान यांच्या मनात शंका आणि डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली. परंतु आकाश भाऊंनी धीर देत, "फिरोज भाऊ, आपण फक्त मेवो हॉस्पिटल नागपूर येथे पोहचा. बाकी सगळं माझ्यावर सोडा. मीं दोन दिवसाच्या आत आपल्या भाच्याला माझा भाचा समजुन ऑपेरेशन करायचा शब्द देतो."
फिरोज भाऊ रात्री 9.30-10 वाजता मेवो हॉस्पिटलला पोहचले. तिथं आकाश भाऊंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळी यंत्रणा अर्जान अली या मुलाची वाट पाहत होती. एका रात्रीत सगळे रिपोर्ट काढून पहिल्याच दिवशी डॉ.वसीम सर, अस्थीरोग सर्जन यांनी अर्जान अलीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले.
शब्दाला जागणारा माणुस, शब्द पाळणारा माणुस म्हणजे अस्तित्व परिवाराचे अध्यक्ष आकाश इंगळे यावेळी स्वतः मेवो हॉस्पिटल नागपूर येथे उपस्थित होते. आज आकाश भाऊंमुळे माझा भाचा सुखरूप आहे, असें आभारपर शब्द यावेळी रुग्णाच्या मामाने व्यक्त केले.
*आमच्या भाच्याकडे फक्त दोन दिवसांचा वेळ होता. आम्ही उम्मीद पुर्णपणे सोडून दिली होती. परंतु आकाश भाऊंनी माझ्या भाच्याला स्वतःचा भाचा समजुन दिलेला शब्द पाळला.चहाचा कप सुद्धा न घेता आकाश भाऊ स्वतः नागपूर पर्यंत आले.ना जातीसाठी,ना धर्मासाठी,अस्तित्व जगते,माणसासाठी,माणुसकीसाठी. हे अस्तित्व परिवाराने पुन्हा एकदा सिद्ध केलं ..!!* फिरोज खान & रहीम खान(रुग्णाचे मामा
*नातं माणुसकीचं जपत मागील तीन वर्षात 3500 पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णसेवा देऊन शेकडो जीवघेणा शस्त्रक्रिया मोफत करून रुग्णांना जीवनदान देणारी अस्तित्व चॅरीटेबल ट्रस्ट सेवेचं व्यासपीठ म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात नावारूपास आली आहे.*

إرسال تعليق