कृती आराखड्यात खामगाव नगरपरिषद नंबर वन
खामगाव-जनोपचार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत खामगाव नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषदेने घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणीला यश मिळाले आहे. जिल्ह्यात प्रथम आलेल्या खामगाव नगर परिषदेने अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
राज्य शासन सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांचा गौरव करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर १०० दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. यामध्ये नगर परिषद विभागनिहाय कोणते कार्यालय सरस ठरले बाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव नगर परिषदेने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला तर अमरावती विभागातूनही खामगाव नगरपरिषदने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या योजनेत नगरपरिषदांनी १०० दिवसांच्या कालावधीत ठराविक उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निकष ठरविण्यात आले होते. यामध्ये खामगाव नगर परिषदेने नागरी सेवा सुविधा, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, जल व्यवस्थापन, कार्यालयीन सोयी सुविधा, ई ऑफिस प्रणाली आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, हरित क्षेत्र विकास, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवा विषयक बाबी, नागरिकांच्या सहभागातून शहर सौंदर्याकरण आदि अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याशी समन्वय साधत १०० दिवस कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामाबाबत सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेतला नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध सुधारणा उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना केल्यामुळे खामगाव नगर परिषदेची उत्कृष्ट कामगिरी दिसून आली
![]() |
| जाहिरात |



Post a Comment