खामगाव कृउबास उपसभापती संघपाल दादा जाधव कार्यसम्राट पुरस्काराने सन्मानित



खामगाव  ( जनोपचार न्यूज नेटवर्क ) - सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संघपाल दादा जाधव यांना प्रबुद्ध सामाजिक संस्था व बौद्ध धम्मिय सामूहिक सोहळा  समिती खामगाव यांच्या वतीने कार्यसम्राट या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे 

           संघपाल जाधव हे नेहमी जनतेच्या अडचणी दूर करणे व गोरगरिबांच्या सेवेत असतात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा कुणालाही रक्ताची गरज असो , आरोग्याची प्रश्न असो ते नेहमी या कामात अविरतपणे सेवा देतात त्यांनी दोन वेळा पंचायत समिती निवडणूक लढवली आहे दोन वेळा ते उपसरपंच राहिलेले  संघपाल जाधव यांनी कधीही हार मानली नाही. 

            फुले शाहू  आंबेडकरी विचारांचे पाईक असलेले संघपाल जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश संपादन केले समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी हीच त्यांच्या कार्याची एक ओळख आहे याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाज बांधवांच्या वतीने  त्यांना प्रबुद्ध सामाजिक संस्था   व बौद्ध धम्मीय सामूहिक सोहळा समिती खामगाव यांच्या वतीने त्यांना राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ, मेहकर  चे आमदार सिद्धार्थ खरात , वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी  सदस्य अशोकभाऊ सोनोने,मा. आमदार राणा दिलीप कुमार सानंदा,  प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद वानखेडे सर, पूज्य भन्ते विनयपालजी, पूज्य भन्ते राजज्योती, एमटी इंगळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रमेश डोंगरे सर, नगरसेवक विजय वानखडे, सेवक सभापती राजेश हेलोडे,  धम्म मित्र नितीनभाऊ सूर्यवंशी,  रिपब्लिकन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश दांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना कार्यसम्राट या पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. 

         यावेळी , भा बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमरावजी तायडे साहेब,  उद्योजक गौतम गवई ,  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे, शरद वसतकार  डॉ सुरेश शिरसाट, सभापती सुरेश पैसोडे, मा. नगराध्यक्ष गणेश  माने, शांताराम पाटेखेडे , एड. अमोल अंधारे ,अंबादास वानखडे, श्रीकृष्ण मोरे, राजूभाऊ वानखडे, भा. बौ. महासभेचे जिल्हा संस्कार सचिव डॉ. अनिल वानखडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  सौ अनिताताई डोंगरे , जिल्हा संघटक तथा खामगाव प्रभारी प्रशांत दमदाडे ज्येष्ठ पत्रकार राहुल पहुरकर,  जयदीप वानखडे, दिनकर सरदार, राहुल हेलोडे, रमेश गवारगुर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र नितीनभाऊ सूर्यवंशी यांनी केले.  या पुरस्काराबद्दल त्यांचे मित्रपरिवार व समाज बांधवाकडून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post