*शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांची तहसील, महावितरण व बँकांमध्ये धडक* 

खामगाव - शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असणारे शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांनी असंख्य शेतकऱ्यांना घेऊन सोमवारी तहसील कार्यालय, रेशन विभाग,  कृषी कार्यालय, महावितरण कार्यालय, व विविध बँकांमध्ये धडक देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

       बघे व शिवसेना पदाधिकारी यांनी सर्वप्रथम तहसीलमध्ये तहसीलदार सुनील पाटील  व तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. त्यामध्ये नमूद करण्यात आले की, मान्सूनपूर्व झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिके हातून निघून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्र शासन व तहसील कार्यालय यांच्याकडून आदेश असताना तलाठी व कृषी सहाय्यक झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तरी याकडे लक्ष देऊन सक्तीचे आदेश देऊन तात्काळ पंचनामे करण्यास सांगावे अशी मागणी करण्यात आली.


    त्यानंतर शिवसेना पदाधिकारी बँक ऑफ बडोदा मध्ये धडकले. याठिकाणी काही शेतकऱ्यांना अडचणी होत्या, परंतु तिथे जातात मॅनेजर सहकार्य करणारे असल्यामुळे सहकार्याची भूमिका घेत ' आप टेन्शन मत लिजिए मै सबका काम करके देता हु'  असे म्हणत सर्वांचे कामे करून दिलेत. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँक शाखा नांदुरा रोड खामगाव येथे मॅनेजर यांनी सुद्धा गेल्याबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविल्या.अशातच कॅनरा बँक खामगाव यांनी लांजुळ येथील शेतकरी यांची पीक विम्याचे पैसे २४ तासात जमा करतो असे मॅनेजरने सांगितले होते, परंतु टेक्निकली अडचण असल्यामुळे अद्याप पर्यंत ते पैसे जमा होऊ शकले नाही त्याच मुद्द्यावर बँक मॅनेजर व वरिष्ठ अधिकारी यांना शिवसेना पदाधिकारी यांनी धारेवर धरले आम्ही पैसे जमा होईपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. अशी भूमिका घेतली. जिल्हाधिकारी यांचे पत्र असताना सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल करून पैसे देण्यास टाळाटाळ करतात. या विरुद्ध शिवसेनेचा लढा चालूच राहील असे बघे यांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे, सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर, किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुडकर,

शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भिल यांच्यासह अनेक शेतकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post