खामगांव तहसिल अंतर्गत पुरविठा विभागातील भ्रष्टाचार तसेच असभ्य  महिला कर्मचारी विरुद्ध शिवसेनेची तक्रार

खामगाव जनोपचार न्यूज :  खामगाव तहसील कार्यालया अंतर्गत येत असलेल्या पुरवठा विभागातील भ्रष्टाचार तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या संपत्ती बाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज तक्रार तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना ही तक्रार देण्यात आली 

तक्रारीत नमूद आहे की खामगाव  तहसिल कार्यालय अंतर्गत पुरवठा विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असुन तालुक्यातील गोरगरीब लाभार्थांना तसेच इतर कामासाठी येणाऱ्या नागरीकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. इतर विभागातील भ्रष्टाचारी कारभार व अनागोंदिस तात्काळ थांबविण्यात यावे. विभागामार्फत गरजु गरीब व सामान्य कार्ड  धारकांना त्रास दिला जातो त्याचबरोबर धन दांडग्या लोकांना अंतोदय बि.पी.एल. सारखे कार्ड देवुन विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. 

जाहिरात


कार्डधारकांना UDID नंबर,आर.बी.नंबर,विभक्त राशन कार्ड,नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे तसेच ऑनलाईन प्रक्रियेसाठी आर्थीक पिळवणुकीसह हिन दर्जाची वागणुक देऊन वेळोवेळी चकरा मारण्यास लावतात. याबाबत तालुका शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी तक्रार, निवेदन व अर्ज सादर केली परंतु कुठलिही कार्यवाही अथवा चौकशी व निष्कर्ष निघत नाही. त्याच अनुषंगाने आज दिनांक 28/05/2025 रोजी या स्थानिक महिला विचारणा करण्यास गेल्या असता पुरवठा विभागातील कर्मचारी श्रीमती प्रियंका टेकाळे महसुल सहाय्यक (लिपीक) हयांनी महिलांना अर्वाच्च भाषेत उध्दटपणे बोलुन खोटेनाटे आरोप करत पोलिस स्टेशनला तक्रार करण्याची धमकी दिली. सदर बाबतीत आम्ही शिवसैनिक व महिला आघाडी चौकशी साठी गेलो असता श्रीमती टेकाळे यांनी अतिषय खालच्या भाषेत गोंधळ घालत उपस्थित अधिकाऱ्यांना न जुमानता गोंधळ घातला. व निवेदन कर्त्यांना धमक्या दिल्या. सदर कर्मचारी अतिषय उध्दट व अर्वाच्च वागणुक दिली. त्यांना जनतेशी कसे वागायचे कळत नाही. विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असुन आर्थीक देवाण घेवाण करणाऱ्यांची कामे होतात, व गरीबांना त्रास दिला जातो. घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ क्लीप व तक्रारी असुन सदर बाबतीत चौकशी करुन श्रीमती टेकाळे हयांचेवर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा संघटनेमार्फत योग्य त्या ठिकाणी तक्रारी करुन वेळप्रसंगी आंदोलन करण्यात येईल. श्रीमती टेकाळे हयांना तात्काळ हटविण्यात यावे. असेही निवेदनात नमूद आहे.





Post a Comment

Previous Post Next Post