शेतकरीराजाला जोपर्यंत त्यांच्या हक्काचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही- बच्चू कडू

मलकापूर :- शेतकर्‍यांना कोणतीही जात-धर्म नसतो, तो या जगाचा पोशिंदा आहे. अशा या शेतकर्‍यांवरच विश्वासघाती महायुती सरकार वेळोवेळी अन्याय करण्याचेच काम करीत आहे. तेव्हा माझ्या शेतकरीराजाला जोपर्यंत त्यांच्या हक्काचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि या सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी दिला


.

तालुक्यातील दाताळा येथे २८ मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची जहीर सभा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित सभेप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख गजाननभाऊ लोखंडकार, जिल्हा उपप्रमुख अजय टप, बलराम बावस्कर संभाजी शिर्वेâ, विलास खर्चे,  तालुकाध्यक्ष अजित फुंदे, शहराध्यक्ष शालीकराम पाटील, नांदुरा तालुका प्रमुख मानकर, अर्जून पाटील यांचेसह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना बच्चूभाऊ कडू म्हणाले की, शेतकरी राजा हा आपल्या घामाकष्टाने शेती पिकवितो, मात्र त्यांच्या माालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे पीक विम्याचा नावाखाली पीक विमा मंजूर होतो मात्र तो पीक मिळण्यासाठी त्यांना वर्षोगणती वाट पहावी लागत आहे, त्यातही काहींवर पिक विम्यामध्येही अन्याय करून त्यांना या पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीचे गाजर या महायुती सरकारे विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते, आज राज्यात त्यांचे सरकार बसले मात्र माझ्या शेतकरी दिलेल्या आश्वासनांचा विसर त्यांना पडला असून केवळ शेतकर्‍यांना आश्वासनांची खैरात वाटीत त्यांची थट्टाच या महायुती सरकारने चालविली आहे. राबराब राबून एका दाण्याचा हजारो दाणे करणारा माझ्या शेतकरी राजाला नफा का मिळत नाही, त्याचे जिवनमान का उंचावत नाही, त्याची लेकरी चांगल्या शाळेत का शिक्षण घेवू शकत नाही असे एक ना अनेक प्रश्न असून सुध्दा सरकार मात्र मुंग गिळून गप्प आहे. तेव्हा मी शेतकर्‍यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि त्यांच्या जिवनात सुख, समाधान व उन्नतीची पहाट उगवत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि या विश्वासघाती सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही, असे सांगितले. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनुषंगाने पुन्हा अशीच आश्वासनांची खैरात वाटण्यात येईल, तेव्हा माझ्या मतदार राजाने सावध होवून यांचा हा कुटील डाव हाणून पाडावा, असेही आवाहन यावेळी केले.

तर विलास खर्चे यांनी बच्चूभाऊ कडू हे शेतकर्‍यांसाठी जो लढा देत आहे, त्या लढ्यात शेतकर्‍यांनी व सर्वसामान्य जनतेने सहभागी होत त्यांचे हात बळकट करीत या सरकारला धडा शिकवावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण भगत यांनी केले. यावेळी मलकापूर तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी, नाागरी, महिला भगिणी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post