तरुणाचे कृत्य समोर येताच अख्खा जिल्हा हादरला
९वर्षीय बालिकेवर.... छीss
पिंपळगाव राजा- येथील पेठ पुरा भागातील एका नऊ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिला गंभीर इजा पोचविल्या प्रकरणी आरोपी रेहान खान मुक्तार खान वय अंदाजे 24 वर्ष याला पोलिसांनी अटक केली आहे.
![]() |
| जाहिरात |
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव राजा येथील चिकन सेंटर चालविणारा आरोपी रेहान खान याने याच पेठपुरा भागातील नऊ वर्षीय बालिका हीं किराणा दुकानावर अंडे घेण्यासाठी आली असता आरोपीने 50 रुपयांची नोट दाखवून बालिकेला चिकन सेंटर च्या दुकानात बोलाविले. व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. सदर घडलेला प्रकार पीडितेने तिच्या नातेवाईकांना सांगितले. यावरून नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दिली. आरोपी आणि पीडित चिमुकली एकाच समाजाचे असून काही वेळातच सदर बाब वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून सदर आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन वर सातशे ते आठशे लोकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात तिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. पोलिसांनी उपयुक्त आरोपी वर गुन्हा दाखल करून पीडीतेला उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे पाठविले. नागरिकांचा रोष पाहता पोलिसांनी दोन विशेष पथके नेमून आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून अटक केली.


إرسال تعليق