सागरदादा फुंडकर व सतीशभाऊ राठी यांच्या वाढदिवसानिमित्त......
२० मे रोजी बुलडाणा येथे बुलडाणा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :बाबुजी गोल्ड एडिबल ऑइल यांच्या सौजन्याने सागरदादा फुंडकर व बुलडाणा जिल्ह्या चेस सर्कलचे अध्यक्ष सतीशभाऊ राठी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणीचे आयोजन गुरुकुल ज्ञानपीठ, धाड रोड बुलडाणा येथे मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेची संलग्नता प्राप्त असलेली बुलडाणा जिल्हा चेस सर्कल, बुलडाणा यांच्या द्वारे आयोजीत महाराष्ट्र राज्य स्पर्धेकरिता बुलडाणा जिल्ह्यातुन खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध गटामधील विजेत्या खेळाडुंना सन्मान चिन्ह व राज्यस्तरीय स्पर्धेचे निवड पत्रक (प्रमाणपत्र) देण्यात येणार आहे.
![]() |
| जाहिरात |
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये होत असलेल्या खालील वयोगटामध्ये अनुक्रमे
*(१ जानेवारी २०१६ नंतर जन्मलेले-९ वर्षाखालील)*
*(१ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेले-११ वर्षाखालील)*
*(१ जानेवारी २०१२ नंतर जन्मलेले-१३ वर्षाखालील)* *(१ जानेवारी २०१० नंतर जन्मलेले-१५ वर्षाखालील)*
*(१ जानेवारी २००८ नंतर जन्मलेले-१७ वर्षाखालील)*
*(१ जानेवारी २००६ नंतर जन्मलेले-१९ वर्षाखालील)* *(ओपन चॅम्पियनशिप)* *(वुमेन्स चॅम्पियनशिप)* अशा आठ गटांची जिल्ह्यातून निवड चाचणी घेण्यात येणार आहे व खेळाडूची निवड करण्यात येणार आहे.
ही *स्पर्धा मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी गुरुकुल ज्ञानपीठ, धाड रोड, बुलडाणा , जि. बुलडाणा* येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये १५ वर्षाखालील (मुले व मुली), १९ वर्षाखालील (मुले व मुली), वुमेन्स चॅम्पियनशिप व ओपन चॅम्पियनशिप या गटातील अनुक्रमे पहिले चार क्रमांक पटकावणाऱ्या विजेते खेळाडू यांना सन्मानचिंह व बुलडाणा जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पत्रक (प्रमाणपत्र) देण्यात येतील. ९ वर्षाखालील (मुले व मुली), ११ वर्षाखालील (मुले व मुली), १३ वर्षाखालील (मुले व मुली), १७ वर्षाखालील (मुले व मुली) या चार गटातुन पहिले दोन विजेते यांना सन्मानचिंह व बुलडाणा जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पत्रक (प्रमाणपत्र) देण्यात येतील.
स्पर्धेची नोंदणी दिनांक १९ मे २०२५ दुपारी २ वाजे पर्यंत करण्यात येईल. ज्या खेळाडूंनी नोंदणी केली आणि ज्या गटामध्ये नोंदणी केली त्यांनाच सहभाग घेता येणार आहे याची दक्षता घेण्यात यावी. *स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूं यांचा आधार कार्ड वर बुलडाणा जिल्हयाचा पत्ता असेल तरच त्यांना सहभाग घेता येईल, आधार कार्ड सोडून दुसरे कोणतेही डॉक्युमेंट्स चालणार नाही याची सर्व स्पर्धकांना नोंद घ्यावी व आधारकार्ड वर बुलडाणा जिल्ह्याच्या पत्ता नसल्यास त्या खेळाडूला स्पर्धा खेळता येणार नाही.* सर्व खेळाडूंनी आपले बर्थ सर्टिफिकेट, ओरिजिनल आधारकार्ड सोबत आणावेत. खेळाडूंनी आपला बुद्धिबळ संच व बुद्धिबळ क्लॉक घेऊन यावे. स्पर्धा सकाळी ठीक १० वाजता सुरू होईल. बुलडाणा जिल्हा चेस सर्कलच्या वतीने सर्व खेळाडूंना प्रवेश *मोफत* देण्यात येईल. आपला सहभाग नोंदवण्याकरिता व इतर माहितीसाठी स्पर्धेचे मुख्यपंच श्री दिपक चव्हाण 07798183896 आणि सौ वर्षा बोबडे यांच्या सोबत संपर्क करावा अशी माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व बुलडाणा जिल्ह्या चेस सर्कलचे सचिव श्री अंकुश रक्ताडे यांनी सांगितले.


إرسال تعليق