लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज मध्ये इ. ११ वीची ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरु


 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : येथील नामांकित लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार या वर्षीच्या शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी  वर्ग 11 वी ऑनलाइन प्रवेश अर्ज रजिस्ट्रेशन करणेऑप्शन फॉर्म भरणे इत्यादी साठी २१ मे २०२५ पासून सुरुवात होत असून  लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजच्या कार्यालयामध्ये दिनांक 21.5.2025 सकाळी 10:00 ते 05.00 या वेळेत मोफत ऑनलाइन प्रवेश अर्ज रजिस्ट्रेशन करणेप्रवेश अर्ज, ऑप्शन फॉर्म भरणे सुरू राहणार आहे. 

            शिक्षण संचालनालय द्वारा प्रकाशित प्रवेश फेरी क्र. १ वेळापत्रकानुसार दिनांक २१ मे सकाळी ११ वाजेपासून इ. ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होत असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ मे सायंकाळी ६ वाजे पर्यंत राहील. ३० मे ला सकाळी ११ वाजता तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. ३० मे ते १ जून सायंकाळी ४ पर्यंत गुणवत्ता यादीतील हरकती आणि सुधारणा करण्याकरिता वेळ दिला जाईल. ३ जून सायंकाळी ४ वाजता गुणवत्ता यादी अंतिम मंजुरी प्रकाशित होईल. ५ जून रोजी गुणवत्ता यादी आधारे निवड व वाटप प्रक्रिया , शून्य फेरी मध्ये व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्यांक कोटा मधील विद्यार्थी वाटप, विभागीय समितीद्वारे तपासणी केली जाईल. ६ जून सकाळी १० वाजता प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय वाटप यादी जाहीर केली जाईल. ६ जून ते १२ जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना मान्य असलेल्या विद्यालयास PROCEED FOR ADMISSION वर क्लिक करणे आवश्यक आहे. १४ जून रात्री १० पर्यंत फेरी क्र. २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल.

            अशा प्रकार  शिक्षण संचालनालय द्वारा प्रकाशित प्रवेश फेरी क्र. १. वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांच्या सोई करिता लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज , डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोररेल्वे स्टेशनच्या बाजुला खामगाव या कार्यालयामध्ये दिनांक 21.5.2025 सकाळी 10:00 ते 05.00 या वेळेत मोफत ऑनलाइन प्रवेश अर्ज रजिस्ट्रेशन करणेप्रवेश अर्ज, ऑप्शन फॉर्म भरणे सुरू राहणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी केले आहे.  अधिक माहित करिता 9422919494, 9960965566, 9403700596 वर संपर्क साधावा. 

Post a Comment

أحدث أقدم