अभाविप खामगाव जिल्ह्याच्या वतीने अनुभूती शिबिर संपन्न
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा खामगाव च्या वतीने दिनांक १७ व १८ मे २०२५ रोजी खामगाव तालुक्यातील गेरू माटरगांव येथे दोन दिवसीय अनुभूती शिबिर संपन्न झाले.
दोन दिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर जिल्हाप्रमुख गणेश घोराळे,गेरूमाटरगांवचे सरपंच अशोक जगताप,खामगाव जिल्हा संघठन मंत्री महेश वाघमारे उपस्थित होते.यावेळी अभाविप जिल्हा प्रमुख गणेश घोराळे यांनी संपूर्ण भारतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे उन्हाळ्यामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर,चल शिबिर,अनुभूती शिबिर आयोजित करत असते या अनुभूती शिबिरा मार्फत शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाची ओळख व्हावी ग्रामीण भागातील जनजीवन समजावं तिथली संस्कृती समजावी याकरिता या अनुभूती शिबिराचा आयोजन करण्यात येते.
![]() |
| जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 820 881 94 38 |
शिबिरात दोन दिवस येथील रहिवास्यांचे राहणीमान, दिनचर्या,त्यांची संस्कृती जवळुन पाहण्याची व अनुभुती घेण्याची संधी आपणास मिळाली आहे.तसेच या भागातील परिसरातील भ्रमंती करून आपल्याला गावाकडील भारत समजून घ्यायचा आहे या दोन दिवसा शिबिरामध्ये आपण शिस्तीत आनंदात राहून ग्रामीण भागातील दर्शनाची अनुभूती घ्यायची आहे असे आवाहन या प्रसंगी गणेश घोराळे यांनी केली.
सरपंच अशोक जगताप यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने आयोजित केलेल्या या अनुभुती शिबिरासाठी आमच्या गावाची निवड केल्या बद्दल अभाविप चे आभार मानुन शिबीरास शुभेच्छा दिल्या.
संगठनमंत्री महेश वाघमारे यांनी शिबीरातील विविध सत्रांची माहिती देऊन शिबीरातुन आपल्या आयुष्यात कधीही न विसरणारी अनुभूती घेऊन जाल अशी अपेक्षा महेश वाघमारे यांनी व्यक्त केली.शिबिरात ३५ विद्यार्थी ंसहभागी झाले होते.गेरुमाटरगांव च्या जंगलात शिबिरार्थयांनी सीडबॉल सोडले, नंतर एका लग्नसमारंभास भेट देऊन त्यांच्या प्रथा समजुन घेतल्या.तसेच वन भोजनाचा आनंद घेतला.रात्री वादविवाद स्पर्धा, विचार मंथन संपन्न झाले.दुसरया दिवशी धरणाला भेट देऊन तेथील परिसंस्थेचा अभ्यास केला.जवळपास ३५ घरात एक किंवा दोघे जनांनी त्यांच्या घरी जावुन दुपारचे भोजन केले.नंतर शिबीराचा समारोपात सहभागी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले.त्यांना मिळालेल्या अनुभवाचा अनमोल ठेवा घेऊन शिबिरारथी परतले.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, अभिजित देशमुख, शुभम राठोड, सुयोग चंद्रे आदिंनी परिश्रम घेतले.



إرسال تعليق