सरस्वती MG, जळगावचा ऐतिहासिक कामगिरीचा विक्रम ४००+ कार्सची विक्री ! भारतातच बनलेल्या MG

गाड्यांना 'मेक इन इंडिया'ला बळ

जळगाव | जनोपचार न्यूज नेटवर्क -उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य MG डीलर सरस्वती MG, जळगाव यांनी ४०० हून अधिक MG कार्सची विक्री करून एक नवे शिखर गाठले आहे. ही आकडेवारी सरस्वती MG साठी अभिमानास्पद ठरली असून, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ही कामगिरी आदर्शवत ठरत आहे.

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली मॉडेल्स म्हणजे MG Hector, Gloster, ZS EV, Astor, Comet EV, तसेच Windsor आणि Windsor Pro. या मॉडेल्सना त्यांच्या सुरक्षितता, स्टायलिश डिझाईन, आधुनिक फीचर्स व उत्तम इंधन कार्यक्षमतामुळे अप्रतिम प्रतिसाद लाभला आहे.


विशेषतः MG Comet EV आणि MG Windsor EV या मॉडेल्ससाठी लाइफटाईम बॅटरी वॉरंटी (अटी व शर्ती लागू) ही सुविधा देण्यात आली आहे. ही अनोखी संकल्पना भारतात सर्वप्रथम MG Motors ने सादर केली असून, पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन समाधानकारक पर्याय म्हणून या कार्सना भरपूर मागणी आहे.


JSW आणि MG India यांच्यात ६ मार्च २०२४ रोजी ऐतिहासिक भागीदारी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा अध्याय भारतातील नामवंत उद्योगसमूह JSW Group आणि जागतिक दर्जाचा ब्रिटीश ऑटो ब्रैड Morris Garages (MG) India यांनी ६ मार्च २०२४ रोजी अधिकृतपणे रणनीतिक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे EV उत्पादन, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट मोबिलिटी आणि 'मेक इन इंडिया' धोरणाला नवे बळ मिळाले आहे.


सरस्वती ग्रुप जळगाव करांच्या सेवेत मागच्या ७ दशका पासून म्हणजेच सन १९५१ साली कै. तुलसीदास टेकवानी यांनी सुरू केलेल्या दुधाच्या व्यवसायापासून सरस्वती डेअरी ते सरस्वती एमजी. सरस्वती ग्रुप हे नाव केवळ MG डीलरशिपपुरते मर्यादित नसून, सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड, सरस्वती एंटरप्रायझेस व सरस्वती MG या विविध क्षेत्रांतही उत्तम सेवा देणारा एक विश्वासार्ह ब्रैड आहे. गुणवत्तेवर आधारित सेवांमुळे सरस्वती ग्रुपने जळगाव जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post