खामगांव नगर परिषद हद्दीतील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम १५० अ (1) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती अंशतः / पुर्णतः माफ करुन कर वसुलीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय क्रमांकः एमयुएम-2025/प्र.क्र.७०/नवि-१७ चे अनुषंगाने खामगांव नगर परिषद हद्दीतील सर्व थकित मालमत्ता धारकांना आव्हान करण्यात येते की, सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त कर दात्यास मिळण्याकरीता मालमत्ता धारकांनी शास्ती/व्याजाची रक्कम वगळुन थकित रकमेचा भरणा करुन 7 दिवसाचे आत अर्ज करावा.
प्रशांत शेळके
मुख्याधिकारी नगर परिषद, खामगांव

Post a Comment