आठवडी बाजारात राबविण्यात आली हिवताप जनजागरण मोहीम

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक आठवडी बाजारात 12 जून रोजी आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप जनजागरण मोहीम राबविण्यात आले. मोहिमे अंतर्गत किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. जुने टायर,नारळाच्या करवंट्या,भंगार वस्तूंची विल्हेवाट लावणे,डासोत्पती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे,शक्य नसल्यास काळे ऑईल टाकणे इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण दिले. हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी गीते यांच्या आदेशानुसार , जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी होगे,  पांडे , वैद्यकीय अधीक्षक डाॅ.टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यामध्ये किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. जुने टायर,नारळाच्या करवंट्या,भंगार वस्तूंची विल्हेवाट लावणे,डासोत्पती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे,शक्य नसल्यास काळे ऑईल टाकणे इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण दिले. हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक करंजकर आरोग्य सहायक .खराटे तसेच आरोग्य कर्मचारी.क्षीरसागर .संत.सरदार .पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post