13 महाराष्ट्र एनसीसी बटालियन व खामगाव नगर परिषदेचा उपक्रम
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करूया-डॉक्टर प्रशांत शेळके
खामगाव(जनोपचार न्यूज नेटवर्क)- निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरण शुद्ध स्वच्छ राहण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो सोबतच प्रत्येक नागरिकांनी हे आपले आद्य कर्तव्य आहे असे समजून ठीक ठिकाणी वृक्ष लागवड करावी असे आवाहन खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी केले
जनूना तलाव परिसरात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 13 महाराष्ट्र एनसीसी बटालियन खामगाव व नगरपरिषद खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 जून रोजी सकाळी 9 वाजता पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके,एनसीसी बटालियनचे दिनेश कुमार खामगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी आनंद देवकाते सर, नगर अभियंता प्रभाकर लबडे, उपाभियंता राजेंद्र म्हस्के, यांच्यासह बचत गटाच्या महिला एनसीसी बटालियनचे विद्यार्थी अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राहावा यासाठी विविध शासकीय कार्यालय मार्फत वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेण्यात येत असतात. नगरपरिषदेच्या वतीने मागील वर्षी जून व जुलै महिन्यामध्ये सुमारे 2800 झाडे जनुना तलाव परिसरात लावण्यात आले होते. त्याचे संवर्धन सुद्धा करण्यात आले आणि आज ते वृक्ष डौलाने डोलत आहे.
या वर्षी सुद्धा जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून खामगाव नगरपालिकेच्या वतीने सुमारे 20 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून नगर परिषदेच्या वतीने खामगाव शहर परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून जनुना तलाव परिसरात दिनांक 5 जून रोजी 1000 वृक्षांचे रोपण व लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी कमांडिंग ऑफिसर 13 महाराष्ट्र एनसीसी बटालियन खामगाव चे दिनेश कुमार एनसीसी चे विद्यार्थी, नगरपालिका कर्मचारी व अधिकारी वृंद सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सुरवातीला नगर परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शेळके,13 महाराष्ट्र बटालियन चे आरएम दिनेश कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरवात करण्यात आली.नंतर प्रत्येक कॅडेट ने एक एक वृक्षाचे वृक्षारोपण केले तसेच नगर परिषद चा कर्मचारी वर्ग तसेच नगर परिषद च्या शिक्षक वर्गाने आणि पत्रकार बांधव व आदी स्वयंसेवकांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी नगर परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शेळके यांनी वृक्षारोपण काळाची गरज आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण संपन्न करणार्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक करुन आभार व्यक्त केले तसेच एनसीसी अधिकारी भरगडे यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले. यावेळी निसर्गप्रेमींचा त्यांच्या कामगिरी बद्दल नगर परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वृक्षारोपणासाठी आरएम दिनेश कुमार, एनसीसी अधिकारी गणेश भरगडे, सुहास पिढिकर, गणेश घोराळे, वसिम बेग मिर्झा,जेसीओ सचिन बोधे पी.आय स्टाफ,गोसे महाविद्यालय,श्री जी वी मेहता नवयुग विद्यालय,अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल, अंजुमन हायस्कूल चे कॅडेट्स सहभागी झाले होते.




Post a Comment