अजब गजब : वर्ग ६ शिक्षक २
जिल्हा परिषदेच्या शाळेवरील रिक्त असलेल्या जागा त्वरित भरा- शाळा समिती अध्यक्षांसह गावकऱ्यांचे निवेदन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- तालुक्यातील गणेशपुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या सहा पदांवर तसेच एक कार्यालयीन लिपीत कायमस्वरूपी मिळावे यासाठी शाळा समिती अध्यक्षांसह गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे निवेदन सोपविले
या निवेदनात नमूद आहे की, मागील ४ वर्षापासून जिल्हा परिषद हायस्कूल गणेशपूर येथील शाळेवर जवळपास ०७ पदे रिक्त असून जुन २०२५ मध्ये एक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण ६ वर्ग असून केवळ २ शिक्षक कार्यरत आहे, त्यामुळे २ शिक्षकांनी ६ वर्गातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून एक संशोधनात्मक विषयच बनला आहे, त्या २ शिक्षकांनी शाळेचा कार्यालयीन प्रभार सुध्दा सांभाळावा का ?. रिक्त पदे खालील प्रमाण मुख्याध्यापक-१,उच्च श्रेणी शिक्षक (भाषा)-१ , उच्च श्रेणी शिक्षक (समाजशास्त्र) -१, उच्च श्रेणी शिक्षक (गणित) -१, विषय शिक्षक (भाषा) इ.६ ते ८-१, निम्न श्रेणी स.शि.-१, कार्यालयीन लिपीक-१ .शाळेतील विद्यार्थी पटसंख्या ही बहुतांश असून शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे कधीही मरुन न येणारे असे अपरिमित नुकसान झाले आहे व भविष्यात सुध्दा होणार आहे.
याबाबत आम्ही वारंवार आपले कार्यालयास रितसर विनंती अर्ज सादर केलेले आहेत व तोंडी सुध्दा मागणी केलेली आहे. मात्र आमच्या या मागणीचा आपल्या कार्यालयाकडून कोणताही विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे नाईलाजास्तव सदरचे अंतीम पत्र सादर करीत आहोत.करिता महोदयांना नम्र विनंती की, शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सदरची पदे तात्काळ भरणेबाबत आपले कार्यालय स्तरावरुन शैक्षणिक सत्र २०२५-२६ सुरु होण्या अगोदर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आम्हाला विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांसह दि. २३/०६/२०२५ रोजी आम्हा विद्यार्थ्यांचे भविष्यातील शालेय नुकसान कसान टाळण्याकरिता जि.प.गणेशपूर च्या शाळेला कुलूप / टाळे लावण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यावेळी निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगास व उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.


Post a Comment