टापरे साहेब ! बघे बघतायत बरं ....!!
सामान्य रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नियुक्त असतानही वैद्यकीय अधिकारी करतात अकोला रेफर....
शिवसेनेने घेतली वरिष्ठांची भेट आणि सांगितली व्यथा!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या असो रुग्णांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भग नेहमी तात्काळ अधिकाऱ्याकडे त्यांच्या व्यथा मांडून समस्या मार्गी लावतात. खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील त्रास वाढत असल्याने अखेर भदे यांनी इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन थेट वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश तापरे यांच्याशी चर्चा केली. चर्चाच नव्हे तर समस्याचे निरसन करण्याची विनंती ही यावेळी त्यांनी केली.
सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दल निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने अकोला येथे रेफर होणाऱ्या रुग्णांसंदर्भात तक्रार करण्यात आली. कारण साधारण रुग्णांना सुद्धा अकोला येथे मोठ्या प्रमाणात रेफर करण्यात येते तोच रुग्ण दुसऱ्या दिवशी बरा होऊन घरी येतो. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांबरोबर त्यांच्या घरच्याला मोठ्या प्रमाणात मनस्ताप व आर्थिक भुदंड त्रास सहन करावा लागतो. विनाकारानचे अकोला येथे रेफर होणारे प्रमाण थांबले पाहिजे त्याच बरोबर रात्रीचे वेळी पेशंट आल्यास डॉक्टर झोपलेले आढळतात रुग्ण तडफडत असताना डॉक्टर वेळेवर हजर होत नाहीत, तसेच अपघाती मृत्यू पावलेल्या पेशंट पोस्टमार्टम सर्व कागदपत्रे तयार असताना सुद्धा डॉक्टर येण्यास वेळ लागतो व त्याचा मनस्ताप सर्व कुटुंबीय बरोबर नातेवाईकांना सन करावा लागतो.
त्याचबरोबर डायलिसिस सेंटर,एक्स-रे मशीन, सोनोग्राफी,सिटीस्कॅनमशीन, अपंग बांधवांना मिळणाऱ्या प्रमाणपत्रात होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना वतीने खामगाव विधानसभा संपर्क प्रमुख सुरेशभाऊ वावगे,तालुका प्रमुख राजेंद्र बघे,शहर प्रमुख चेतन ठोंबरे,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात,उप शहर प्रमुख भाऊ बिडकर,उप तालुका प्रमुख संतोष दुतोंडे, उप तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,महादेव पाटील, अनुसूचित जाती जमाती शहरप्रमुख मयूर खंडारे, शिवसेना विभाग प्रमुख गोपाल शेळके,विभाग प्रमुख जिवन सोळंके,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,शाखा प्रमुख प्रमोद पोरे,विभाग प्रमुख आकाश माने, विभाग प्रमुख चेतन शेलकर,शाखाप्रमुख रुपेश तायडे,विष्णु काळे यांचे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.



إرسال تعليق