आई-वडिल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  पाच लक्ष रुपयांच्या पुस्तकांचे मोफत वाटप

श्री सरस्वती ईंग्लिश स्कूल अंत्रजच्या माध्यमातून पुढील तीन वर्षाकरिता आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके व ईतर सुविधा उपलब्ध करून देणार- श्रीकांत चोपडे 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असणारे संस्थाचालक श्रीकांत चोपडे व निलेश चोपडे  यांचे वडील स्व.महादेवराव चोपडे यांनी गावात ई.सन 1987-88 साली शासनाच्या अंगणवाडी नसताना  स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील महादेवराव चोपडे व शिवसेनेचे नेते ,मित्र मंडळ गणेशभाऊ कोल्हे, गजानन भाऊ चोरे, महादेवराव राठोड व अंत्रज ग्रामस्थ यांच्या मदतीने स्थापन केले होते शिवाजी बालक मंदिर पाच-पाच रूपये वर्गणी जमा करून  चालायचे बालक मंदिर... पुढे शासन स्तरावर अंगणवाड्यांचे नियोजन झाल्यामुळें  बालक मंदिराचे कार्य थांबले परंतु गावासाठी एकच चांगली शैक्षणिक संस्था शाळा असली पाहिजे असे कायम स्वप्न मनात होतेच ते वडिलांचे स्वप्न आज श्री सरस्वती 

इंग्लिश स्कूल अंत्रज च्या माध्यमातून पुर्ण झाले... स्व.महादेवराव चोपडे यांचे  एक वर्ष आधी आजारपणामुळे निधन झाले त्यावेळी बऱ्याच जुन्या चालीरीती यांना फाटा देत मोठ्या प्रमाणात खर्च न करता तो पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे असे विचार वडील यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे श्रीकांत चोपडे यांनी  वडिलांच्या तेरवी श्राद्ध मध्ये खर्च न करता ते पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च झाले पाहिजे म्हणून संस्थेच्या माध्यमातून पाच लक्ष रुपयांचे पुस्तके गरजु विद्यार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला समाजासमोर नवीन आदर्श असणाऱ्या या निर्णयाचे सर्वांनी जोरदार स्वागत केले. संस्थेने याआधी देखील  Covid19 मध्ये   90/%  विद्यार्थ्यांना शुल्क माफी देऊन सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कायम ठेवले सर्वसामान्य एखाद्या वडिलांच्या मृत्यूमुळे विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना आधार देत आजही सामाजिक भान  संस्थेच्या माध्यमातून जोपासले जात आहे.आई वडिलांच्या संस्कार व शिक्षण यामुळेच आदर्श व्यक्तिमत्व घडते  त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे या उद्देशाने आई -वडिलांच्या   स्मृतिप्रित्यर्थ श्री सरस्वती ईंग्लिश स्कूल अंत्रज च्या माध्यमातून पुढील तीन वर्षाकरिता आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके व ईतर सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे परिसरातील अनेक विद्यार्थीना लाभ होईल आणि इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण घेऊन उज्वल भविष्य मिळेल  असे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत चोपडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

Post a Comment

أحدث أقدم