शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खामगाव तालुका अध्यक्षपदी संजय बगाडे
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ; राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाच्या खामगाव तालुका अध्यक्षपदी संजय बगाडे यांची नियुक्ती खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संजय बगाडे यांची नियुक्ती ही पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई खेडेकर यांनी पत्राद्वारे केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून खामगाव तालुका अध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे या ठिकाणी संजय बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली
संजय बगाडे यांचे नियुक्तीने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे लवकरातच लवकर तालुका कार्यकारणी गठीत करून गावागावात पक्षाची बांधणी करून खामगाव तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संजयजी बगाडे यांनी सांगितले त्याचप्रमाणे पक्षाच्या वरिष्ठांनी टाकलेला विश्वास त्या विश्वासाला मी तळाला जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले

إرسال تعليق