महाविद्यालयातील जात प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना ९० दिवसांचा कालावधी मिळावा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन 


 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: महाविद्यालयातील जात प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना किमान ९०  दिवसांचा कालावधी मिळावा अशी मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात नमूद आहे की, महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालयात प्रवेशासाठी लाखो विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज भरले आहे. विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्रासाठी महाविद्यालयाकडून दबाव टाकून प्रवेश नाकारण्याची शक्यता आहे. हजारो विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहे आणि त्याची रितसर पावती विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहे आणि जात प्रमाणपत्र मिळविण्याकरिताचा कालावधी २१ दिवसांचा आहे. परंतु तांत्रीक अडचणीमुळे सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे मुदतीच्या आत जात प्रमाणपत्र उपलब्ध होण्यास विलंब होतो. तसेच हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी जात प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याने सर्व्हर सह महसुल यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.

तरी शिक्षण मंत्र्यांनी संबंधित विभाग व महाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन आदेश देवून विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून जलद गतीने कळवावे व जात प्रमाणपत्र महाविद्यालयांमध्ये सादर करण्याकरीता किमान ९० दिवसांचा कालावधी देण्यात यावा. प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांचा प्रवेश रखडल्यास किंवा नाकारल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन उभारेल व त्यापासून उद्भवणाऱ्या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी महाराष्ट्र शासन व प्रशासनावर राहील असे गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री,  पोलीस महासंचालक,जिल्हाधिकारी,

जी.प.शिक्षणाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक,अति.जिल्हा पोलीस अधिक्षक,एस.डी.ओ. खामगांव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم