खामगांव येथे अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशनचा शपथविधी

खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्रातील सिल्व्हर सिटी खामगांव येथे अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशनचा शपथविधी समारोह रविवार, २२ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता स्थानिक श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे. अध्यक्ष देवेंद्रसिंह मुणोत, सचिव नरेश चोपडा, चेअरमन समीर संचेती, कोषाध्यक्ष विरेंद्र शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन (रजिस्टर) चा एक नविन ग्रुप सुरू होणार आहे, जो महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सामाजिक ग्रुप स्थापन करण्यासाठी काम करेल.

सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष जिनेश्वरजी जैन इंदौर, पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष पियुषजी जैन इंदौर, पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाशजी भटेवरा इंदौर, राष्ट्रीय महासचिव नरेंद्रजी भंडारी इंदौर व श्रीमती किरण सिरोलिया इंदौर, फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी गौतमजी मुणोत जालना यांची उपस्थिती राहणार आहे. वरील माहिती मार्केटींग कॉम्युनिकेशन अध्यक्ष संजय छल्लानी यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post