नागरिक हक्क संरक्षण समिती, खामगांव च्या अध्यक्षपदी भिकाजी रेठेकर तर सचिवपदी अॅड. तरुण मोहता यांची सर्वानुमते निवड

खामगाव: Janopchar news network - नागरिक हक्क संरक्षण समिती, खामगांव च्या ची बैठकी १७ जून रोजी राज विमा सेवा केंद्र कार्यालय, नांदुरा रोड, येथे  सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ता अश्विनभाई पटेल यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीमध्ये नागरिक हक्क संरक्षण समिती खामगांव स्थापना करण्यात आली असुन सभेमध्ये सर्वानुमते समितीच्या अध्यक्ष पदी भिकाजी रेठेकर राहणार सती फैल, खामगांव यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी अॅड. तरुण मोहता यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विकास चव्हाण, कोषाध्यक्षपदी राजेंद्रसिंह राजपुत तथा कार्यकारिणी सदस्य म्हणुन निलेश ठाकुर, सुभाष इटनारे, गणेश पिंपळकर, संजय नळकांडे, राजेश ढवळे, गणेश क-हाळे,शालिनीताई दादाराव हेलोडे, मनिषाताई भोपळे यांची निवड करण्यात आली. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post