दोघांना अटक: तीन मोटरसायकली जप्त: खामगाव व बुलढाणा येथे चोरट्यांनी केला होता हात साफ
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगाव व बुलढाणा येथून चोरी गेलेल्या तीन मोटरसायकली खामगाव शहर पोलिसांनी दोन चोरट्यांकडून जप्त केल्यात. ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेक चोरीच्या दुचाकींचा ऊलगळा लागला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारखामगाव शहर पोस्टे अप नंबर 214/ 2025 बी एन एस कलम 303[2] प्रमाणे दिनांक 19/6/ 2025 रोजी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 02 मोटरसायकल MH28 BE 4214, MH 28 AV 3197 तसेच बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथील अप नंबर 373/ 2025 BNS sec. 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील चोरीस गेलेली 01 मोटरसायकल क्रमांक MH 28 AH 9214 एचएफ डीलक्स अशा एकूण 03 मोटरसायकल सदर अपराधाच्या तपासामध्ये आरोपी नामे 01.पवन भगवान बर्डे वय 26 वर्ष रा ता पातुर जि अकोला विश्वजीत प्रकाश सुरडकर 24 वर्ष रा रिधोरा जहांगीर ता मोताळा जि बुलढाणा यांच्याकडून जप्त करण्यात आल्याने पोस्ट खामगाव शहर येथील एक अपराध व पोस्टे बुलढाणा शहर येथील एक अपराध असे दोन गुन्हे उघड करण्यात आलेलं आहे.

Post a Comment