पिक विमा ची रक्कम कर्ज खात्यात वळती करणाऱ्या बँकांना राष्ट्रवादी चा इशारा

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांचा आंदोलनाचा इशारा



खामगाव(प्रतिनिधी)  तालुक्यात  शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असून तो पिक विमा काही बँकांनी कर्ज खात्यामध्ये वळता केला आहे.शेतकऱ्यांना तात्काळ वरती केलेल्या रक्कम पिक विमा मध्ये जमा करावा अन्यथा राष्ट्रवादी शरद पवार आदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना संकटाच्या काळात पिक विमा च्या आलेल्या पैशाचा उपयोग करता आला नाही. आता पेरणीचे दिवस असून शेतकऱ्याकडे पैसे नाहीत पिकविम्याचे आलेले पैसे कर्ज खात्यात वळते करण्यात आले त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँकेकडून शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर त्रास देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आमच्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खामगाव तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात वळती केले असून ते आलेले पैसे शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे अन्यथा ज्या बँकांनी शेतकऱ्यांचे पिक विमा चे पैसे कर्ज खात्यात वळवले आहेत त्या बँकांना टाळे ठोकुन आंदोलनाचा इशारा उपविभागीय अधिकऱ्यांना यावेळी देण्यात आला आहे

Post a Comment

Previous Post Next Post