लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती वर्ष २०२५-२६ वर्षाची नवीन कार्यकारीणी जाहीर
अध्यक्षपदी एमजेफ लाॅ आकाश अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. निशांत मुखिया तर कोषाध्यक्षपदी लॉ. सी ए आशिष मोदी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: शहरातील सामाजिक संस्थांमध्ये समाजसेवेसाठी बहुचर्चित असलेल्या लॉयन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या अध्यक्षपदी एमजेफ लाॅ आकाश अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. निशांत मुखिया तर कोषाध्यक्षपदी लॉ. सी ए आशिष मोदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उर्वरीत कार्यकारिणीमध्ये अॅडव्हायझर म्हणून लॉ. अशोक गोयनका, लॉ सीएम जाधव आयपीपी लॉ शैलेश शर्मा, फर्स्ट व्हीपी लॉ. उज्वला संजय उमरकर,सेकंड व्हीपी लॉ राजेंद्र थाडा, थर्ड व्हीपी लॉ. तेजेंद्र सिंग चव्हाण सहसचिव लॉ सिद्धेश्वर दाणे लॉ विजय शर्मा, सहकोषाध्यक्ष लॉ हरीश अग्रवाल, लॉ ब्रिजमोहन अग्रवाल, ट्रेलस्ट्रिस्टर लॉ. स्नेहिल गोयनका , टेमर लॉ. सौ सोनल पियुष टिबडेवाल,ग्लोबल मेंबरशीप टीम- एमजेएफ लॉ अजय एम अग्रवाल,एम जे एफ़ लॉ नरेश चोपड़ा, लॉ अमित गोयनका , लॉ संजय उमरकर. ग्लोबल सर्विस टिम -लॉ प्रशांत सानंद,लॉ परिक्षित मानकर,लॉ पीयूष टिबड़ेवाल,एमजेएफ लॉ सूरज बी. अग्रवाल ग्लोबल लीडरशिप टीम- एमजेएफ लॉ सूरज एम अग्रवाल,एम जे एफ़ लॉ डॉ भगतसिंह राजपूत, लॉ निशिकांत कानूनगो. पिआरओ - एमजेएफ लॉ राजकुमार गोयनका,एम जे एफ़ लॉ वीरेंद्र शहा. बुलेटिन संपादक - लॉ सौ शिल्पा आकाश अग्रवाल, लॉ सौ प्रिशा निशांत मुखिया, लॉ सौ सुरभि आशीष मोदी.निर्देशक 24-25 वर्ष साठी- लॉ सतीश अग्रवाल,एम जे एफ़ लॉ शशिकांत सुरेखा,लॉ गोविंद चूड़ीवाले,लॉ अजय खंडेलवाल , लॉ.सीए आनंद सुरेका,लॉ सौ शालिनी भगतसिंह राजपूत.निर्देशक वर्ष 25-27 साठी - लॉ सौ. सपना देवेन्द्र मुनोत,लॉ सुशील मंत्री,लॉ अमेय सानंदा,लॉ गजानन सावकार, लॉ राजेश खेरडावाल.अन्नसेवा टिम - एमजेएफ लॉ अभय अग्रवाल (ZC वर्ष 25-26),एम जे एफ़ लॉ उज्वल गोयनका,लॉ अजय छटवानी,सौ. लॉ दिव्या अभय अग्रवाल,लॉ सरिता अजय अग्रवाल ,लॉ अजय एस अग्रवाल, लॉ योगेश शर्मा.लॉ रविंद्रसिंह बग्गा यांची निवड करण्यात आली. अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती या क्लबचे अनेक उपक्रम उदाहरणार्थ अन्नसेवालय गरजूंना दररोज पूर्ण जेवण गव्हर्मेट हॉस्पिटल येथे दुपारी ठीक एक वाजता वाटप करण्यात येते, तसेच त्या ठिकाणी कचऱ्याच्या जागेवर सुंदर असे उद्यान सुद्धा लायन्स क्लब संस्कृतीने निर्माण केले आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या रक्षणासाठी बांधारे, भल्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, प्लास्टिक कचरा रोखण्यासाठीचे उपक्रम तसेच नद्यांमधील पाणी शुद्ध करण्यासाठी बायो एन्झाईन चा वापर इत्यादी नवीन उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. संस्कृतीचा वारसा टिकून ठेवण्यासाठी रंग दे तिरंगा प्रतियोगिता आयोजन, स्थानिक गरजूंसाठी भोजन कुपन व थंड जल प्याऊ चे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी खेळ, आरोग्य विषयक सेमिनार, करियर गायडन्स सेमिनार असे विविध व उपक्रम. गरजू रुग्णांना औषधे व इतर साधनांचा पुरवठा, मेडिकल चेकअप कॅम्प, ब्लड शुगर चेक अप कॅम्प, हेल्थ चेकअप कॅम्प, आय चेक अप कॅम्प, डोळ्यांचे ऑपरेशन, शाळातील मुलांचे डोळे तपासणी अभियान, रोडवर व्यवसाय करणाऱ्या बांधवांना ऊन व पावसाच्या पासून संरक्षणासाठी छत्र्यांचे वाटप. पारधी समाज आश्रमशाळा व लायन्स क्लब द्वारा प्रेरित मूक बधिर विद्यालय येथील विद्यार्थ्यांना भोजन नाश्ता दूध बिस्किट कपडे खेळणी व इतर शालेय साहित्यांचे वाटप. इत्यादी अनेक उपक्रम सातत्याने घेत असलेल्या या क्लबचे अध्यक्ष पद सचिव पद व कोषाध्यक्ष पद मिळालेल्या नवीन कार्यकारणीला मावळते अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा सचिव लॉ. तेजेंद्रसिंग चौहान व कोषाध्यक्ष लॉ गजानन सावकार यांनी स्वागत व अभिनंदन केले. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख एम जे एफ लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

إرسال تعليق