खामगांव येथे जैन श्वेताम्बर ग्रुपचा शपथविधी समारंभ संपन्न

खामगांव -जनोपचार न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ऑल इंडिया जैन श्वेताम्बर सोशल ग्रुप फेडरेशन (रजिस्टर्ड) द्वारे चालविल्या जाणाऱ्या ग्रुपच्या कार्यपध्दती आणि सेवाकार्याने प्रभावीत होऊन, महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारी गौतमजी मुणोत जालना यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील खामगांव येथे एक नविन ग्रुप स्थापन करण्यात आला. ज्याचा शपथविधी सोहळा रविवार, २२ जुन २०२५ रोजी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जिनेश्वर जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

शपथविधी सोहळ्यात महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पियुष जैन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सीए.नरेंद्र भंडारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस श्रीमती किरण सिरोलिया विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मंगलाचरणाने समारंभाची सुरूवात झाली तर अतिथींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरीक हिरेनभाई लोडाया, सुभाष बेगाणी, सोहनलाल झांबड, सुरेश चोपडा यांचा सत्कार करण्यात आला.

शपथविधी समारंभाला संबोधीत करतांना राष्ट्रीय अध्यक्ष श्री जिनेश्वर जैन म्हणाले की, जैन श्वेताम्बर समाजाच्या एकता, प्रगती, समृध्दी आणि संलग्नतेसाठी पुर्ण समर्पण आणि सेवाभावाने काम करणे हे आपल्या महासंघाचे कर्तव्य आहे. तसेच महासंघ विविध सामाजिक सेवा प्रकल्प तयार करणे आणि चालविणे, शिक्षण, वैद्यकीय आणि रोजगारासाठी योजना हाती घेणे इत्यादी विविध कामे करतो.

यावेळी महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पियुष जैन, राष्ट्रीय सरचिटणीस श्रीमती किरण सिरोलिया, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सी.ए. नरेंद्र भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले

राष्ट्रीय अध्यक्ष जिनेश्वर जैन यांनी खामगांव ग्रुप अध्यक्ष देवेंद्र सपना मुणोत यांना पदाची शपथ दिली. पदाधिकाऱ्यांना सीए नरेंद्र भंडारी यांनी तर कार्यकारणी सदस्यांना फेडरेशन वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रभारी गौतम सोनाली मुणोत जालना यांना शपथ दिली. या समारंभास श्रीमती चित्रा जैन इंदौरे यांची विशेष उपस्थिती होती. या शपथविधी सोहळ्यात नरेश किरण चोपडा, सचिन पल्लवी शहा, समीर रिध्दी संचेती, शितल पुजा नहार, विरेंद्र डिंपल शहा, राजीव मीनल शहा, नितीन भावना खिलोशीया, ममता रिनेश बेगानी, संदेश प्रिया झांबड, रितेश उर्वी संघवी, गगनचुंबी संघ, नीरव गंगाजी, ममता रितेश बेगानी उपस्थित होते. मंचाचे संचालन गुंजन नितेश भंसाळी आणि कृतीका देवेन खेलसिया यांनी केले. सचिव नरेश किरण चोपडा यांनी आभार व्यक्त केले. शेवटी समारंभाची सांगता राष्ट्रगिताने झाली. वरील माहिती मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन संजय जया छल्लानी यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم