संजय बगाडे यांच्या तालुकाध्यक्ष निवडीमुळे पक्षांमध्ये नवचैतन्य...!
खामगांव - जनोपचार न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक बांधणीस नवे बळ देत संजय बगाडे यांची खामगांव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, हि निवड पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा आमदार सौ रेखाताई खेडेकर यांनी एका का पत्रकार द्वारे केली. संजय बगाडे यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नवचैतन्य निर्माण झाले आहे. संजय बगाडे हे संघटनात्मक कुशल अभ्यासू व संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी या अगोदर पक्षामध्ये विविध सामाजिक संघटनेमध्ये व पक्षामध्ये जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे महाराष्ट्राचे संघटन सचिव शिवाजीराव (रावसाहेब) पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार नानाभाऊ कोकरे, खामगाव चे माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे नेते गणेशराव माने, जिल्ह्याचे संघटन सचिव व गाढे अभ्यासक संभाजीराव टाले, खामगाव विधानसभा अध्यक्ष धोंडीराम खंडारे, यांच्या शिफारशीनुसार व पक्षाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष संतोष पिसोडे, उपाध्यक्ष मोहन पाटील,सामाजिक सेलचे तालुका अध्यक्ष उमेश बाभुळकर, युवकचे शुभम राऊत, गौरव पवार, वैभव खोटरे, विद्यार्थीचे अनिकेत सहारकर, सोपान खोटरे, संतोष कोठरे यांच्या विनंतीवरून एकमताने निवड करण्यात आली आहे.

Post a Comment