![]() |
| जाहिरात |
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात
खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क: - मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये आजपासून निधी जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरलेली ही योजना महायुती सरकारच्या दृढ निश्चयामुळे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वीपणे पुढे जात आहे. ही माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली. त्यांनी सांगितले की, “लाखो लाडक्या बहिणींच्या जीवनात आर्थिक स्थैर्य व सन्मान निर्माण करणारी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल, यावर आमचा ठाम विश्वास आहे."लाडकी बहिणी'साठी सरकारचा सन्मानाचा हात महाराष्ट्रातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलांना दरमहा सन्मान निधी देऊन त्यांचे जीवन सुकर करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. मे महिन्याचा हप्ता वेळेवर खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थीमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


Post a Comment