सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस पॉलीटेक्निक चा उत्कृष्ट निकाल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- वसुंधरा बहूद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस पॉलीटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे या यावर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत परीक्षेमध्ये प्रविण्य प्राप्त केले . सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस मध्ये संपूर्ण सुसज्य प्रयोगशाळा,अनुभवी प्राध्यापक वृंद आणि निसर्गरम्य वातावरण असलेले जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालय आहे. महाविद्यालया मध्ये अनुभवी आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेला प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक ग्रंथालय, विविध तंत्र कार्यशाळा तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय ला लागणाऱ्या साधनांचा प्राध्यापकांनी योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल या भाषेत दिलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा उपयोग करीत सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी मारलेली गगन भरारी लक्ष वेधी आहे. या सत्रा अंतर्गत प्रथम वर्ष पदवीका अभ्यासक्रम मध्ये प्रथम वर्षामध्ये संगणक आणि विज्ञान शाखेमधून अंशिका शैलेश कुटे ८७%, विदयुत शाखे मधून अथर्व बढे ७३. ५३%,यंत्र शाखे मधून प्रथमेश हरिदास बोबडे ६५. ६६%, स्थापत्या शाखेमधून प्रसाद राजेंद्र मसने ७७%. ५६%,अनुविदयुत आणि दुरसंचार शाखे मधून पूजा संजय विनके ७५. २९%, आर्टिफिसिअल इंटिलिजन्स मधून जय विष्णू जोशी ८९.५३%. दृतीय वर्ष्यामधून संगणक आणि विज्ञान शाखेमधून अमर मुकिंदा गुलडे ८२. ४७%, विदयुत शाखे मधून योगेश सेंगर ७७. २९%,यंत्र शाखेमधून संदीप दीपक फिरके ७२. ५६%, स्थापत शाखेमधून प्रतीक्षा राजू दुबेकर ७४%
अनुविदुत आणि दुरसंचार शाखेमधून आचल विनोद कव्हर ८४ %.तसेच तृतीय वर्ष्यामधून संगणक आणि विज्ञान शाखेमधून पार्थ सतीश वावगे ८७. ४१%, विदयुत शाखे मधून आदित्य दिलीप गिऱ्हे ८३. ५०% ,यंत्र शाखेमधून सार्थक अजय तरस ७५%, स्थापत शाखेमधून यश राजू वावरे ८२%
अनुविदुत आणि दुरसंचार शाखेमधून प्रनव म. कडाळे ८६. २७% या विध्यार्थी नी प्रविण्य प्राप्त केले. सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस चे अध्यक्ष माननीय श्री सागर दादा फुंडकर व संस्थेचे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय ऍड. श्री आकाश दादा फुंडकर व पदवीका महाविद्यालया च्या प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतजी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

إرسال تعليق