खामगावातील अतिक्रमण हटाव मोहीम म्हणजे "ना काहु से दोस्ती, ना काहू से बैर! "
माजी न प उपाध्यक्ष मुन्ना पूरवार यांच्या सरकी लाईन स्थित दुकानच्या टिन शेड वरही चालवली बुलडोझरची नांगी



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- अनेक दिवसांपासून प्रस्तावित करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज अखेर सुरू झाली आहे. शहरातील अनेक दिग्गजांचे देखील अतिक्रमण यावेळी काढण्यात आल्याने अतीक्रमण हटाव मोहीम म्हणजे  " ना काहो से दोस्ती ना कह से बैर "अशी असल्याचे दिसून येते. नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मुन्ना पुरवार यांच्या सरकी लाईन स्थित दुकानासमोरील देखील तिनशेड वर बुलडोजरची नांगी चालविण्यात आली आहे.

स्थानिक नगरपरिषद पासून ते बस स्थानक पोलीस स्टेशन चौक टावर चौक नांदुरा रोड त्याचप्रमाणे सरकी लाईन आठवडी बाजार भाग या भागातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू झाली.
 पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत असून यामुळे शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.खामगाव नगर पालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमणधारकांना काही दिवसापूर्वीच नोटिसा देवून आपआपली अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे शहरात ध्वनिक्षेपक फिरवून देखील अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी नगर पालिकेच्या वतीने विशेष पथक स्थापन करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. संपूर्ण तयारी झाल्यानंतर आज सकाळी ११ वाजे पासून शहरात प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. स्वतः मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी रस्त्यावर उतरून मोहीम राबविण्यास सुरुवात केली. नगर पालिका चौका पासून या कारवाईला प्रारंभ करण्यात आला. तगड्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण तोडण्यात आले. बस स्थानक ते टॉवर चौक - जलंब नाका तसेच टॉवर चौक ते पंचशील होमिओपॅथी रुग्णालय, सरकी लाईन, भुसावळ चौक या भागातील अतिक्रमण हटविण्यात आले असून वृत्त लिहेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم