अखेर शहर पोलिसांनी घेतली दखल..
शेगाव रस्त्यावरील "ब्लॅक पॉइंट"वर लावले फलक
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगाव शेगाव मार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने अपघात स्थळावर किंबहुना वळणावर बोर्ड अथवा ब्रेकर लावले नसल्यामुळे सुसाट वाहनांच्या वेगाने अनेक अपघात घडली आहेत. काही महिन्यापूर्वी घडलेला तिहेरी अपघात अजूनही अंगावर शहारे निर्माण करणारा आहे. याच पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या पुढाकाराने व गुळ वे यांच्या सहकार्यातून खामगाव शेगाव मार्गावरील त्या अपघात वळणावर सावधान अपघात क्षेत्र असा फ्लेक्स बोर्ड लावून वाहने हळू चालवा असे नमुना केले आहे. पोलिसांच्या गुळवे यांच्या या कामाबद्दल नागरिकांमध्ये कौतुक केल्या जात आहे.

Post a Comment