विकासकामात अडथळा आणणारी अतिक्रमणे काढा
स्वराज्य फाउंडेशन खामगावची मागणी
खामगांव:खामगाव शहरातील रस्ते वा नाल्या बांधकामात अडथळा आणणारी अतिक्रमणे काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगाव ने केली आहे.या संघटने खामगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,
खामगाव शहरात कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता कामे करण्यात येत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ता व नाली बांधकाम कामात अडथळा निर्माण होत असल्याने कामें पूर्णत्वास जात नाही.तसेच अर्धवट कामांमुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातास कारणीभूत ठरत आहे.येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे.सुरू असलेल्याअर्धवट कामाचा मलबा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमणामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेले आहे.त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबधीत रखडलेल्या कामामुळे शहरवासी त्रस्त झालेले आहे,यामुळे रस्ता कामादरम्यान अडथळा निर्माण करणरी अतिक्रमणे १५ दिवसाच्या आत हटविण्यात यावी अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर स्वराज्य फांऊंडेशन खामगाव वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर स्वराज्य फाउंडेशन खामगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शहराध्यक्ष कुलदीप राजपूत, अभिजीत ठाकूर,शैलेश पैठणकर,नितीन सुर्वे,गौरव भालेराव,आदित्य श्रीनाथ,प्रदीप महाले,आयुष्य गवई,सुजलसिंग ठाकूर प्रज्वल घायाल,यांच्या आदींच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रतिलिपी ना.आकाश फुंडकर कामगार मंत्री, नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री बुलढाणा जिल्हा,जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहे.

إرسال تعليق