शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांच्या ‘अन्नत्याग उपोषणाला’ खामगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि जनतेने ठाम पाठिंबा द्यावा – गजानन लोखंडकार

माजी मंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा. बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या मोझरी येथे “अन्नत्याग उपोषण” सुरु केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला धोरण, वंचित घटकांसाठी घरे, दिव्यांगांना मानधन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी सुरू असलेले हे आंदोलन केवळ विदर्भाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्याशी जोडलेले आहे. या आंदोलनामागे कोणताही राजकीय हेतू नाही, हा शेतकऱ्यांचा हक्काचा लढा आहे.

प्रहार पक्षाचे ध्येय “जनतेसाठी शासन” यामागे आहे आणि त्याला दिशा देण्यासाठी बच्चूभाऊंचा हा त्याग अत्यंत प्रेरणादायी आहे.आज जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत खुर्च्यांसाठी लढत आहेत, तेव्हा बच्चूभाऊ स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसले आहेत.

या त्यागाच्या लढ्याला फक्त प्रहार कार्यकर्त्यांनी नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जागरूक नागरिकाने साथ दिली पाहिजे. कारण या मागण्या केवळ एका पक्षाच्या नाहीत, त्या आपल्या घराघरातील गरिबांच्या आहेत.त्यांच्या या उपोषणाला बुलढाणा जिल्हा, विशेषतः खामगाव तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते, शेतकरी बांधव, युवक आणि सर्वच नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे मी जाहीर आवाहन करतो.



Post a Comment

أحدث أقدم