ग्रामपंचायत अधिकाऱ्याला तलवारीने हातपाय तोडण्याची धमकी: महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
मेहकर जनोपचार न्यूज नेटवर्क: नेमणुकीवर असलेले ग्राम पंचायत अधिकारी यांना तलवारीने हातपाय तोडण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तिघांविरुद्ध मेकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हकीकत अशाप्रकारे आहे की परमेश्वर किसन पिसे वय 42 वर्षे व्यवसाय नोकरी (ग्रामपंचायत अधिकारी) रा.शारंगधर नगर, मेहकर ता. मेहकर जि.बुलडाणा हे ग्राम मोहोतखेड येथील ग्राम पंचायत अधिकारी म्हणुन नेमणुकीस असून नमुद घ ता वेळी व ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बुलडाणा यांचेकडुन प्राप्त तक्रार अर्जावरून कायदेशीर कर्तव्य पार पाडीत असतांना आरोपी क्र. 1) शिवाजी निवृत्ती भोपाळे, 2)श्रीमती सिंधु व 3)पवन शिवाजी भोपाळे सर्व रा. मोहोतखेड यांनी फिर्यादीला व त्यांचे सोबत असलेले बाल संरक्षण समीतीचे सदस्य तसेच चाइल्ड हेल्पलाइनचे कर्मचारी यांना आ क्र.01 शिवाजी निवृत्ती भोपाळे याने फिर्यादीस तु जास्त माजला का, मादरचोद तु आमचे काय वाकडे करणार आहे ते मी पाहतो, तर आरोपी क्र. 02 श्रीमती सिंधु हीने हा xxx पोटचा ग्रामसेवक, हा xx खातो का अशी अश्लील शिवीगाळ केली तर आरोपी क्र 03 पवन शिवाजी भोपाळे याने फिर्यादीस तु जर पुन्हा गावात आला तर तलवारीने तुझे हात पाय तोडतो अशी धमकी देवून शासकीय कामात अटकाव केला. बाबतचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment