![]() |
| जाहिरात |
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना काँग्रेस कडून भावपूर्ण श्रद्धांजली
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नागरिकांना खामगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १३ जून रोजी सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गुजरात मधील अहमदाबामध्ये गुरूवार १२ जून रोजी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान क्रॅश होऊन भीषण अपघात झाला. यावेळी सर्व प्रवासी, क्रू मेंबर्स, पायलट तसेच विमान ज्या वसतीगृहाच्या इमारतील धडकले तेथील शिकाऊ डॉक्टर्स यांच्यासह २६५ जण मृत्यूमुखी पडले. देशाच्या इतिहासातील अतिशय भीषण अशा या अपघातामुळे फक्त भारतच नव्हे तर अख्खं जग हादरलं आहे. दरम्यान घटनेच्या तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढचे दोन दिवस राज्यभर आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करत या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार १३ जून रोजी येथील महात्मा गांधी उद्यान येथे खामगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पष्पहार अर्पण करून व मेनबत्ती प्रज्वलित करत मौन पाळून मृत्यु पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील, क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राजाराम काळणे, काँग्रेस पक्षाचे नेते शे.जुल्कर शे चांद, प्रदेश सचिव धनंजय देशमुख, महा. प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाचे सरचिटणीस गौतम गवई, अल्पसंख्याक विभागाचे सचिव वसिमोद्दीन भाई, ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तेजेंद्रसींह चव्हाण, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष स्वप्नील ठाकरे, शेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे, खरेदी विक्री संचालक पांडुरंग राखोंडे, माजी नगरसेवक किशोरआपा भोसले, माजी नगरसेवक इब्राहिम कंडक्टर, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन वाकुडकर, जेष्ठ नेते अनंतराव ताठे, माजी पंचायत समिती सदस्य सर्वश्री विठ्ठल सोनटक्के, इनायतभाई, खामगाव ग्रामीणचे उपसरपंच नदीमभाई, सुटाळा खु. उपसरपंच जयेश वावगे, लाखनवाडा उपसरपंच प्रकाश इंगळे, अँड. अशोक इंगळे, सुधाकर डुकरे, हाफीज खान, कंझारा सरपंच शफीउल्ला खान, डॉ गुफरान खान, किसान काँग्रेसचे नेते मंगेश भारसाकळे, ओबिसीचे युवा नेते सुरज बेलोकार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शेख कयुम भाई, युवक काँग्रेसचे मयूर हुरसाड, मा सरपंच सोपान लाहुडकार, संतोष गावंडे, सेवादलाचे अमित तायडे, शेख राजिक, आवेश खान, सागर पांढरे, संतोष चव्हाण, सौरभ रिछारिया, बबलू भाई सजनपुरी, छोटू राजपूत, राजू पटेल, शेख रहेमान, अक्षय शंकरवार, मो इरफान, इलियास अहमद , रफिक शाह, शेख अनिस, अक्षय पवार, प्रमोद मोरे, गणेश सवडतकर, शेख अयान, शोरब खान, शेरू चौधरी, सैयद जाफर, अनिस दुकानदार, अतर मलिक, आसिफ चंदू, अश्फाक अल्ला, शोयब शेख यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




إرسال تعليق