पोलीस दलातील "कबीरा" एलसीबीत 

अब अवैध कारोबारोंकी खैर नाही...!

 बुलडाणा (जनोपचार न्यूज नेटवर्क)- जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कान, नाक, डोळे समजल्या जाण-या स्थानिक गुन्हे शाखा  निरीक्षक पदी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांची 30 जून रोजी रात्री उशीरा  नियुक्ती करण्यात आली . पोलीस  निरीक्षक  सुनील अंबुलकर यांनी 1  जुलै रोजी त्यांनी एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या एलसीबी प्रमुख पदाच्या नियुक्तीमुळे गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचे  धाब दणाणले आहे.

पोलीस विभागाt  स्थानीक गुन्हे शाखेला मोठे महत्त्व आहे. या गुन्हे शाखेमध्ये अत्यंत्य संवेदनशील व क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास केला जातो . एलसीबी ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कान, नाक, डोळे समजल्या जातात. गुन्हेगारांचे कर्दनकाळ असणारे जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस निलेश  तांबे यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणा-या पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांची एलसीबी प्रमुख पदी एका आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली. तर सुनिल अंबुलकर यांनी याआधी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा पदभार सांभाळला आहे.  त्यानंतर त्यांची जालना त्यानंतर  बुलडाणा येथे बदली झाली होती. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी बुलढाणा येथे गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांची एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) प्रमुखपदी नियुक्ती होताच होताच रेती माफीया, अवैध धंदे करणाऱ्यांचे व गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post