खामगावतील अतिक्रमणधारकांना त्वरित गाळे उपलब्ध करून द्यावे : राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून गावाचा चेहरा मोहरा बदलून विकासात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे
परंतु ज्या अतिक्रमणावर बोललो जर चालवण्यात आला आहे त्यांच्यावर बेरोजगारीची फार मोठी कुराड कोसळली आहे त्या बेरोजगारांसाठी त्वरित नगर परिषदेने गाले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी श्री प्रशांत शेळके यांना करण्यात आली आहे त्या संदर्भात श्री शेळके यांना निवेदन सुद्धा देण्यात आले असून
त्वरित रोजगाराचा हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे अतिक्रमणधारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असली तरी या अतिक्रमणधारकांनाच प्राधान्याने हे गाळे उपलब्ध करून देऊन त्यांचा रोजगार सुरू करावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे केंद्र व राज्य शासनाने बेरोजगारी हटावसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले आहेत परंतु नगर परिषदेने स्वयंरोजगार या माध्यमातून त्वरित गाड्यांची निर्मिती करावी व खामगावकरांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment