विवाहितेची अल्पवयीन मुलासह पुण्यात आत्महत्या: आरोपीच्या अटके कामी पुणे पोलीस खामगावात!
खामगाव - स्थानिक घाटपुरी नाका भागातील मुळ रहिवासी व पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील दळवीनगर भागात वास्तव्यास असलेल्या मयुरी शशिकांत देशमुख (३१) हीने चिमुकला विश्वजित शशिकांत देशमुख (६) याला सोबत घेवून इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल १९ जून २५ रोजी घडली. विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी लाल लिपस्टिकने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. 'माझ्या नणंदेच्या छळामुळे हा निर्णय घेत आहे,' असे 'सुसाईड नोट'मध्ये नमूद केले आहे. दरम्यान आज सकाळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे PSI मारूती वाघमारे पोस्टे आंबेगाव, पूणे शहर सोबत पोना जमदाडे, पोका खाडे, गायकवाड तसेच मपोका जाधव हे आरोपीचा शोध घेणे कामी खामगाव येथे आले असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी मयुरीचा भाऊ सचिन ठाकरे (२४) रा. खामगाव, याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून मयुरी यांचा पती शशिकांत त्र्यंबकराव देशमुख (३८) रा. कल्पकसृष्टी, दळवीनगर, आंबेगाव याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह सासू रमाबाई त्र्यंबकराव देशमुख (६५), रा. घाटपुरी नाका, खामगाव, आणि नणंद मेघा रवींद्र देशमुख (३५) रा.येवदा, दर्यापूर यांच्याविरोधात तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी आणि शशिकांत यांचे २०१८ मध्ये लग्न झाले आहे. पुढील तपास सुरू आहे

Post a Comment